Home शैक्षणिक गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार श्री शिवाजी महाविद्यालय राजुराच्या...

गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार श्री शिवाजी महाविद्यालय राजुराच्या विशाल शेंडे ला प्राप्त.

1
0

प्रतिकार

(प्रतिकार  न्यूज नेटवर्क ) निलेश नगराळे , राजुरा
राजुरा:- श्री, शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक विशाल मनोहर शेंडे याला २०१९-२० वर्षातील गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार सन्माननीय कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी, प्र- कुलगुरू मा. श्रीराम कावळे, कुलसचिव मा. चिताडे, रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी, मा. मुकुंदजी कानेटकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी श्री, शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की उपस्थित होते.
   विशाल शेंडे यांनी बी.ए. ला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना च्या विविध उपक्रमातून प्रेरणा घेत, राष्ट्रीय सेवा योजना मार्फत महाविद्यालयात होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग होत असत. सोबतच त्याच्या स्वगावात विद्यार्थ्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहे.
   विशाल शेंडे याने राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर सुद्धा विविध शिबिरात सहभाग घेतला, राष्ट्रीय एकता शिबिर गुवाहाटी येथे महाराष्ट्र राज्य संघामध्ये त्यांचा सहभाग होता,
   वरूर रोड येथे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सामाजिक, शैक्षणीक, सांस्कृतिक असे नानाविध उपक्रम राबवित आहे. विशालने युवा मित्राच्या सहकार्याने गावामध्ये जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. आणि गावातून दहा हजाराचा निधी गोळा करून वाचनालयासाठी पुस्तके उपलब्ध केली. विशालने गावात मतदान जनजागृती , थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन, लहान विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन, वृक्षारोपण, तंबाखू व्यसन मुक्तीसासाठी जनजागृती पर कार्यक्रम स्वच्छता अभियान , एड्स जनजागृती, रॅली, तसेच लॉक डाऊन च्या काळात, कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अनेक प्रयत्न कले , गावामध्ये फवारणी व गरजूंना मास्क वितरण , सोशल मीडिया वर जनजागृती इत्यादी कार्य केले याबद्दल विशाल ला ग्रामपंचायत कार्यालय वरुर रोड यांच्या कडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच लॉक डाऊन काळात विशाल ने मुखमंत्री सहायता निधी साठी स्वतःच्या मजुरितून एक हजार रुपये व मित्राकडून मिळालेले 800 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले. आणि मित्रांना निधी जमा करण्यास आवाहन केले या आवाहनाला साद देत अनेकांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान केअर फंड मध्ये निधी गोळा केली… तसेच विशाल शेंडे याने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत, गुवाहाटी (आसाम) येथे झालेल्या निबंध स्पर्धेत सहभाग घेऊन, पंधरा राज्यातील विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक घेऊन गोंडवाना विद्यापीठ, महाविद्यालयाचे नावलौकिक केले.
       या संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विविध जागरूकता कार्यक्रम राबविताना गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गुरुदास बलकी, डॉ. सारिका साबळे याचे मार्गदर्शन लाभले.
       विशाल च्या या यशाबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, रासेयो कार्यक्रम अधिकारी, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी , आई वडील, स्वयंसेवक मित्र मैत्रिणी यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here