* राजुरा तालुक्यात आठ दिवसात तिसरी शेतकरी आत्महत्या
* पांढरपौनी येथे नापिकीमुळे युवा शेतकर्याची आत्महत्या
राजुरा.
राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील युवा शेतकरी प्रभाकर बापूजी वैद्य, वय ३३ याने आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.या पूर्वी पाचगाव,विरुर येथील शेतकऱयांनी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेवटी आत्महत्या आता ,पांढरपौनी येथील तरुण शेतकरी ,
मृतक प्रभाकर यांचेवर कर्ज होते. यावर्षी चांगले पीक आल्यास कर्जातून मुक्त होऊ असा त्यांना विश्वास होता. आपल्या नातेवाईक व मित्रांना त्याने तसे बोलूनही दाखविले होते. परंतु यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व नापिकी मुळे प्रभाकर हादरून गेला. अनेक दिवसापासुन तो त्याच विचारात बेचैन राहत होता. अखेर शेतात जाऊन त्याने आपली जिवनयात्रा संपविली. या दुर्दैवी घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राजुरा तालुक्यात गेल्या आठ दिवसात झालेली ही तिसरी आत्महत्या आहे. यामुळे येथे तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिकार न्युज