Home राष्ट्रीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विधापीठ”ज्ञानाच विधापीठ!बाबासाहेबांच्या नावासाठी! प्राण गेलातरी बेहत्तर फक्त बाबासाहेब…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विधापीठ”ज्ञानाच विधापीठ!बाबासाहेबांच्या नावासाठी! प्राण गेलातरी बेहत्तर फक्त बाबासाहेब…

67
0

भोकर …

नांमातर !चळवळीत शाहिद धम्म बांधवाना विनम्र अभिवादन !!!
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा

*नामविस्तार*
दलित पँथरच्या त्यागातून संघर्षातून बलिदानातून अत्याचारातून हजारो लाखो भीमसैनिकांनी जेलची हवा खावून घडवलेला क्रांतिकारी नवा इतिहास म्हणजेच बाबासाहेबांच्या नावासाठी उदयास आलेली नांमातर चळवळ!
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विधापीठ”ज्ञानाच विधापीठ!
आताचे किडे नुसते वाँटसप फेसबुकवरच वळवळतात आप आपसात एकमेकांची टिंगल टवाळी करतात समाजात एकजूट करण्या ऐवजी स्वार्थासाठी सतरा पार्ट्या आठरा पार्ट्या काढून स्वताला राष्ट्रीय नेता म्हणून मिरवतात समाजाची दिशाभूल करतात! जीकडे कुटका टाकल तिकडे पळतात! स्वार्थासाठी भीमा तुझी अभ्यास नसलेली टूक्कार पोर शिक्षण वाघिणीचे दुध आहे ते प्राशन करीत नाहीत मोक्याच्या जागी जात नाहीत उधोग धंद्याकडे वळत नाहीत! दहावी बारावी झाली की उगीच गुरगुरतात तेव्हा लोक शिकले नव्हते पण एकहोते नेक होते.म्हणून आम्ही नामांतरासाठी काढलेल्या *मोर्चात पायी चालत येत होते*!बाबासाहेबांच्या नावासाठी! प्राण गेलातरी बेहत्तर कशाची पर्वा करीत नव्हते.आम्ही मोर्चात जावून मुंबईच्या दादर,व्हीटीच्या फुटपाथवर पेपरच अथरून करून झोपलो की तेव्हा रात्रीला पोलिसांच्या दंड्याचा प्रसाद देत होते!कधी जेलची हवा मिळाली त्याची आम्ही पर्वाच केली नाही बाबा!
केवळ बाबा तुम्ही रूढीपंरमपरेने घालून दिलेल्या नीच दलित पिढीत समाजात खालच्या जातीत जन्मालात म्हणून तुमच्या नावला सवर्णच नव्हे तर बहुजन वर्गातील अज्ञानानी बांधवांनी ही विरोध केला होता.बाबा तुमचा संघर्ष एका जाती समुहा साठी नव्हता तर हजारो वर्षांपासून गुलामीचे जीवन जगणाऱ्या नीच जातीत गणल्या गेलेल्या वंचित घटकांना माणूस म्हणून स्वाभिमाने जगता यावे म्हणून होता. ज्या गुलाम लाचार समाजाला शिक्षणाची द्वारे खुली नव्हती मंदिरात जाण्यास बंदी होती पाणी पिण्यास बंदी होती त्यासाठी आपण सत्याग्रह करतांना सनातण्यानी दगड धोंड्याचा मारा केला ती सयंमाने फुले म्हणून झेलली मोठ्या परिश्रमाने भारतीय संविधान लिहून तमाम ओबीसी,जससी,एसटी,भटक्या गलामांना न्याय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होता एवढा संघर्ष त्याग शिक्षण बुद्धी विध्दवतेच्या बळावर मिळवून देवून ही!व्यवस्थेने जाती जातीत पुन्हा महापुरुष निर्माण केले.तुझ्या नावासाठी मात्र चौदा वर्ष वनवासांने वाट बघावी लागली.
*फक्त जात नसलेल्या जात व्यवस्थेमुळे!*
नामविस्तार!दिनांच्या
सर्वाना सुभेच्छा!✊🌹
जयभीम-जयभारत🙏
एल.ए.हिरे भोकर,जि.नांदेड

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here