Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात 1 मृत्यूसह 24 नवे बाधित

चंद्रपूर जिल्ह्यात 1 मृत्यूसह 24 नवे बाधित

1
0

चंद्रपूर, दि. 12 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 25 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 24 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एक मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 742 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 19 झाली आहे. सध्या 345 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 86 हजार 700 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 61 हजार 909 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये केळापूर जि. यवतमाळ येथील 68 वर्षीय पुरूषाचा समावेष आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 378 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 344, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 12, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. Covid 19 update Chandrapur
आज बाधीत आलेल्या 24 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील नऊ, चंद्रपूर तालुका दोन, बल्लारपुर एक, भद्रावती एक, सिंदेवाही एक, राजुरा दोन, चिमूर एक, वरोरा पाच व इतर ठिकाणचे दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here