Home क्राइम अरे बापरे! धावत्या बसमध्ये युवतीवर बलात्कार ; काय चाललयं आपल्या महाराष्ट्रात‬!

अरे बापरे! धावत्या बसमध्ये युवतीवर बलात्कार ; काय चाललयं आपल्या महाराष्ट्रात‬!

35
0

By

Pratikar News

 प्रतिकार  न्युज नेटवर्क
नााागपूर ग: नागपूर येथून पुणे येथे खासगी बसने प्रवास करणार्‍या 24 वर्षीय युवतीवर शस्त्राच्या धाकावर अत्याचार करण्यात आला. ही धक्कादायक घटना धावत्या ट्रॅव्हल्समध्ये मालेगाव पोलिसांच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी पीडितेने राजनगाव येथे पोहचल्यानंतर तक्रार दिली. पुणे जिल्ह्यातील राजनगाव पोलिस स्टेशनकडून सदर प्रकरण मालेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
ट्रॅव्हल्सचा क्लिनर समीर देवकर असे या घटनेतील नराधम आरोपीचे नाव आहे. सदर प्रकरणाने एकच खळबळ उडाली असून खासगी ट्रॅव्हल्स मधील प्रवासा बाबत महिलेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथील 24 वर्षीय तरुणी ही राजनगाव एमआयडीसी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे एका इंजिनिअरिंग कंपनीत कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी सदर युवतीच्या चुलत बहिणीचे लग्न असल्यामुळे ती आपल्या मूळगावी गोरेगाव जि. गोंदिया येथे आली होती. सदर लग्नसोहळा आटोपून ता. 6 जानेवारी रोजी पीडित युवती ही पुण्याला जाण्याकरिता नागपूर येथून गुडविल नावाच्या खासगी ट्रॅव्हल्स क्रमांक यूपी 73 ए- 8020 या मध्ये बसली होती. दरम्यान या ट्रॅव्हल्सवर कार्यरत क्लीनर समीर देवकर वय 28 वर्षे रा. सिताबर्डी जि. नागपूर या आरोपीने खासगी बस चालू असताना वाशीम जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव ते बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर या प्रवासादरम्यान या युवतीला चाकूचा धाक दाखवून दोन वेळा अत्याचार केला. याप्रकरणी तक्रारीवरून आरोपी क्लिनर समीर देवकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम पोलिसांचे पथक आराेपीच्या शोधात नागपूरला रवाना झाले आहे.

अकोला भाजपा महिला आघाडीतर्फे सरकारचा निषेध
राज्यात एकाच दिवशी ३ बलात्काराच्या घटना घडल्याने तिव्र रोष व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरात गर्भवती महिलेवर सामुहीक बलात्कार, औरंगाबाद मध्ये ही सामुहीक बलात्काराची घटना‬ तर वाशिम मध्ये ही चालत्या खाजगी बसमध्ये मुलीवर बलात्कार ‬करण्यात आला आहे. या सर्व प्रकारावरून राज्यात कायद्याचा धाक उरला नसल्याचे दिसते. या सर्व प्रकाराबाबत रोष व्यक्त करीत अकोला भाजपा महिला आघाडीने सरकारचा निषेध नोंदवला आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here