चंद्रपुर वासियांना जावे लागत आहे अनेक समस्यांना पार करून पुढे
(प्रतिकार न्यूज निलेश नगराळे )
चंद्रपुर : शहरात खाजगी ट्रैवल्स भरगर्दीतल्या रसत्यावर पार्किंग होत असुन शहर वाहतूक नियंत्रण कर्मचारी खुल्या डोळ्याने पाहून शांत राहतात.
चंद्रपुर शहर आज इंडस्ट्रीअल क्षेत्र म्हणुन ओळखले जात असुन रोज येथे वाढती गर्दी पहायला मिळते शेकडो जन बाहेरून रोज ये-जा करतात यात कित्येक खाजगी बस मालक आपला व्यवसाय ठामुन बसले आहेत पण यांची मनमानी जनतेला त्रासदायक ठरली आहे.
शहरातील अरुंद रस्ते आणि वाढती गर्दी यामधे खाजगी बसेस भर रस्त्यात थांबून अथवा वाहतुकिच्या मार्गावर पार्किंग असल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे आणि या घटना वाहतूक कार्यालय आणि रामनगर पोलिस स्टेशन सामोर घडते आहे कर्मचारी पण शांत का असि शंका जनतेला निर्माण होत असुन उद्या एखादी जीवघेणी घटना घडल्यास याला जिम्मेदार कोण असा प्रश्न जनतेला पड़ला आहे.