Home Covid- 19 चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 48 नव्याने पॉझिटिव्ह ; एक मृत्यू #Corona

चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात 48 नव्याने पॉझिटिव्ह ; एक मृत्यू #Corona

20
0

गत 24 तासात 56 कोरोनामुक्त

48 नव्याने पॉझिटिव्ह ; एक मृत्यू
आतापर्यंत 1,83,754 नमुन्यांची तपासणी
उपचार घेत असलेले बाधित 330
चंद्रपूर, दि. 8 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 56 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
तर 48 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 604 वर पोहोचली आहे.
 तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 897 झाली आहे.
सध्या 330 बाधितांवर उपचार सुरू आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 83 हजार 754 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 58 हजार 777 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये गौराळा वार्ड भद्रावती येथील 54 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 
जिल्ह्यात आतापर्यंत 377 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 344, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 11, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 48 रुग्णांमध्ये
 चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 25, 
बल्लारपुर दोन, 
भद्रावती पाच, 
मूल एक, 
पोंभुर्णा एक, 
राजूरा एक, 
चिमूर दोन, 
वरोरा चार, 
कोरपना दोन, 
जिवती तीन व 
इतर ठिकाणचे दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here