वर्धा -महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर बैतुल जिल्ह्यातील सालबर्डी या एतिहासिक ठिकाणी विज्ञाननिष्ठ मानवतावादी बुद्ध संस्कृतीचा अनमोल ठेवा पूर्णक्षतीग्रस्त,अर्धक्षतीग्रस्त किंवा विद्रुपीकरण झालेल्या अवस्थेत पाहायला मिळतो.यामध्ये दगडी खांबामध्ये कोरलेले अशोकचक्र,राजमुद्रा,पदमपाणी,लाफिंग बुद्धा, स्तूप,विहार,ध्यान साधनेची जागा,संघाराम आणि लेण्या इ अवशेष बुद्ध संस्कृतीची ओळख पटवून देते.हा गौरवशाली,प्रेरणादायी वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत जावा आणि भावी पिढीसाठी त्याचे संगोपन व संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने ” लक्षप्राप्ती द्वार “या लेण्यांमध्ये सम्राट अशोकाच्या काळात मूर्त्यासाठी वापरलेल्या “चुनार ” या दगडातील भूमीस्पर्श मुद्रेतील महाकारूनिक भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची विधिवत स्थापना पाली भाषेचे अभ्यासक तथा विख्यात बौद्ध भिक्षु वंदनिय डॉ भदंत आनंद कौसल्यायन यांच्या 116 व्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवार दि 5 जानेवारी 2021 ला स्थानिक वंदनिय भन्ते रट्टपाल व बुद्धा टेकडी मित्र परिवार वर्धेचे मुख्य प्रेरक वंदनिय भन्ते कारूनिक यांचे प्रमुख मार्गदर्शनात व वंदनिय भिक्षुनी संघ यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आली .
सातपुड्याच्या पर्वतरांगा आणि निसर्गाचा हिरवागार शालू पांघरलेली गर्द वनराई आणि याच वनराईत मोठं मोठे डोंगर कपारी चिरत नागमोळी वळण घेत खळाळून वाहणारी माळू नदी व गुप्त गंगा नदीच्या संगमावर असलेल्या सालबर्डी या ठिकाणी स्थानिक बुद्धा टेकडी मित्र परिवार तर्फे 20 डिसेंबर 2020 ला *धम्म सहल *नेण्यात आली होती त्यावेळी भन्ते कारूनिक यांनी 5 जानेवारी हा त्यांचा जन्मदिन,त्यांच्या गुरूंचा जन्मदिन व प्रसिद्ध बौद्ध भिक्षु डॉ भदन्त आनंद कौसल्यायन यांचीही जयंती येते व या त्रिवेणी संयोगावर येथील लेण्यांमध्ये बुद्ध मूर्ती स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला होता आणि तो मनोदय स्थानिक युवा टीम,भन्ते रट्टपाल व वर्धेच्या बुद्धा टेकडी मित्रा परिवाराच्या परिश्रमाने पूर्ण करता आल्याचे समाधान भन्तेच्या चेहऱ्यावर होते
या मूर्तीच्या स्थापनेसाठी व कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी सालबर्डी येथील राहुल मडीकर, आशिष मडीकर,पवन मडीकर,निवेश मडीकर,आशिष भुबरकर,गोपी भुम्बरकर,अश्विन नागले,निखिल नागले,यश चौकीकर,अंकित शिवणकर,आदित्य मडीकर,विनय भुम्बरकर,प्रतीक शिवणकर,कुशल आठनेरे,यांचेसह वर्धा टीमचे कपिल चांदनखेडे,प्रफुल शेंडे,निखिल भगत,वैभव शेलकर,प्रयाग धनविज,राज शेलकर,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कांबळे,विश्वेश्वर हाडके,डॉ सागर बाबू,गोवर्धन टेम्भुरने, शयामभाऊ पाटील,इ सह बुद्धा टेकडी मित्र परिवार चे सर्व सदस्य व स्थानिक गावकरी यांनी परिश्रम घेतले . साथी सध्या या लेण्या दुर्लक्षित आहे जायला धड रस्ता नाही आपण या लेण्याच्या संगोपन व संवर्धनासाठी सालबर्डी या ठिकाणी भेट देऊन आपला हातभार लावावा असे सुचवावेसे वाटते तसेच मध्यप्रदेश शासन व भारतीय पुरातत्व खात्याने ही याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे .
संकलन
प्रकाश बा कांबळे
बुद्धा टेकडी मित्र परिवार वर्धा