Home आपला जिल्हा थोर समाजसुधारक , ज्ञानज्योती , विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची...

थोर समाजसुधारक , ज्ञानज्योती , विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून 3 जानेवारी ला संपन्न….

109
0

राजुरा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या , भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक , ज्ञानज्योती , विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून 3 जानेवारी 2021 ला डॉ, बाबासाहेब आंबेडकर वार्ड राजुरा येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आयु. गेमचंद चांदेकर , श्री. योगेश करमनकर प्रविण करमनकर , श्री.संजय नगराळे , श्री. नंदू भोयर , श्री . सुरेश भगत , श्री, राहुल वनकर , श्रीमती सुगंधाबाई मावळणकर यांच्या शुभ हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला फुल अर्पित करून दीप प्रजवलीत करून अभिवादन करण्यात आले.
याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिवसभर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये रांगोळी स्पर्धेत प्रथम कु कशीश मावळणकर , द्वितीय कु . जान्हवी करमनकर , तृतीय कु. अनुश्री मावळणकर, यांनी तर महिलांच्या मोमबत्ती पेटविणे स्पर्धेत प्रथम सौ. सौ प्रज्ञा चहारे, द्वितीय सौ शारदा वनकर , यांनी तर संगित खुर्ची स्पर्धेत मुलांमध्ये कुमार ओम मावळणकर , मुलींमध्ये कु मानवी करमनकर , महिलांमध्ये सौ सुमन ब. वाघमारे यांनी तर लिंबू चमचा या स्पर्धेत मुलीमध्ये प्रथम कु जान्हवी करमनकर , द्वितीय कु चिन्मयी नगराळे , तृतीय कु मानवी करमनकर , मुलांमध्ये प्रथम ओम मावळणकर , द्वितीय प्रतिक करमनकर , तृतीय सिद्धांत मालखेडे , महिलांमध्ये प्रथम सौ स्नेहा भोयर , द्वितीय सौ पुष्पा मावळणकर , तृतीय सौ श्रीमती गिरजाबाई जगताप यांनी क्रमांक पटकविला. यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्व स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
सायंकाळी वार्डातील मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन यामध्ये भाग घेणाऱ्या 30 मुलांना पाहुण्यांचे हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला , यावेळी दिनबंधु परिवार राजुरा यांच्या वतीने उत्कृष्ट नृत्यकलाकार व नृत्य दिग्दर्शक कु मानवी करमनकर व सर्व स्पर्धकांना सामूहिक मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु, मानवी व अनुजा यांनी तर आभार प्रदर्शन वृक्षप्रेमी भास्कर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ , प्रीती करमनकर ,श्रीमती गिरजाबाई जगताप, सोनी वनकर , शुभांगी जगताप , राकेश जगताप , अंकित जगताप , अविनाश पुणेकर , अनिल मून, पुंडलिक कोल्हे , जोगेंद्र चहारे, प्रशांत वनकर , आसिफ सय्यद , सचिन करमनकर , नागसेन करमनकर , छोटेबाबा करमनकर , संजूभाऊ कहूकर यांनी अथक परिश्रम घेतले असे वृक्षप्रेमी भास्कर सर यानी एका पत्रकाद्वारे कलविले.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here