Home आपला जिल्हा मालमत्ता कर व उपभोगता करातुन सुट दिली पाहिजे…बल्लारपुर जनतेच्या वतीने मागणी…

मालमत्ता कर व उपभोगता करातुन सुट दिली पाहिजे…बल्लारपुर जनतेच्या वतीने मागणी…

47
0

बल्लारपुर…

मालमत्ता कर व उपभोगता खरातुन सुट दिली पाहिजे…

 

बल्लारपूर दि.6/1/ 21. बल्लारपूर नगर परिषदे ने मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना नोटीस जारी केलेत. त्यात मालमत्ता कर, उपभोक्ता करांचा विवरण आहे. कोविद-19, मुळे सलग बिल दोन वर्षाचे पाठविण्यात आले. त्यात उपभोक्ता कर ₹. 360/-जोडल्या गेला आहे हा नागरिकांना नाहक वेठिस धरण्याचा प्रकार आहे.सोबतच त्यावर व्याजाची आकारणी ही होत आहे. कोविड-19 मुळे लोकांना पैशाची चणचण आहे.बिले उशिरा,वरुन व्याज हे व्यथित करणारी बाब आहे. करिता दि .6/7/ 21,ला मा.विजय कुमार सरनाईक मुख्याधिकारी, नगर परिषद बल्लारपूर ,यांना हे कर मालमत्ता कर व उपभोगता कर 2020-21साठी रद्द करण्याची विनंती करणारे विविध सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे. व वरिल कर या वर्षाकरिता रद्द करण्याची मागणी करण्यात आली असुन ती पूर्ण झाली नही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.निवेदन मा.जि.के.उपरे यांच्या नेतृत्वाखाली मा.मुख्याधिकारी यांना देण्यात आले.या प्रसंगी मा.प्रभाकर मुरकुटे, मा.अरविंद चव्हाण, मा.आइ.बी.पटेल,मा.रमाकांत तिवारी, बि.डी.चव्हाण, मा.ताराचंद थुल, एम.टी साव सर. इ.उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here