प्रतिकार
(बल्लारपुर प्रतिनिधी )
फुले दांपत्यांच्या समाजाभिमुख क्रांतिकारक कार्यामुळे आज महिलांना संवैधानिक अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात महत्पयासांने मिळवून दिले. त्यामुळे आज महिला विविध क्षेत्रात महत्वाच्या भुमिकेत दिसतात. म्हणून बिएस फोर(भारतीय संविधान, सन्मान, संवंर्धन,सुरक्षा) या राष्ट्रव्यापी अभियानाला राबवून लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यरत राहण्याचे वक्तव्य महिलांनी केले.कार्यक्रम साव सर बालाजी वार्ड यांचे घरी संपन्न झाला.अध्यक्षता मा.संघा साव, से.नि.मुख्याध्यापक यांनी केले.संचलन मा.प्रा.रश्मी बारसागडे,यांनी केले.सर्व महिलांनी राष्ट्रमाता सावित्रीबाई यांच्या कार्याचा गौरव केला.या प्रसंगी मा.जि.के. उपरे व मा.सिंधू उपरे यांचा सत्कार करण्यात आला. विमल कांबळे,संध्या जानके,रूपाली कांबळे,सुजाता उपरे,जया तामगाडगे, माया करमनकर,सुलोचना मालखेडे,शिला नगराळे, उज्वला दबडे इ.नी मत प्रदरशित केले.आभार आम्रपाली उपरे यांनी मानले. धन्यवाद।एम.टी.साव सर,बालाजी वार्ड,बल्लारपूर.