Home शैक्षणिक “जय भीम” चे जनक एल. एन. हरदास यांच्या जयंतीप्रित्यर्थ रिपब्लिकन पार्टीतर्फे त्यांच्या...

“जय भीम” चे जनक एल. एन. हरदास यांच्या जयंतीप्रित्यर्थ रिपब्लिकन पार्टीतर्फे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

13
0

#जयभीम

“जय भीम” चे जनक एल. एन. हरदास यांच्या जयंतीप्रित्यर्थ रिपब्लिकन पार्टीतर्फे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
💐💐💐

एल. एन. हरदास (६-१-१९०४ — १२-१-१९३९ ) हरदास लक्ष्मणराव नगराळे ऊर्फ बाबू एल. एन. हरदास, कामठी नागपूर, हे स्वातंत्रपूर्व भारतातील कामगारांचे पुढारी व समाजसुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे (Independent Labour Party) मध्य प्रांताचे जनरल सेक्रेटरी होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रखर अनुयायी राहिलेल्या बाबू हरदास यांनीच सन १९३५ मध्ये प्रथमतः ‘जय भीम’ चा जयघोष करून ‘अभिवादन’ करण्याच्या प्रथेस सुरुवात केली म्हणून त्यांना ‘जय भीम’चे जनक मानले जाते.

बाबासाहेब स्वतःदेखील ‘जयभीम’ म्हणून अभिवादन करणाऱ्यास ‘जयभीम’ म्हणत असत. एवढेच नव्हे तर अखिल भारतीय दलित फेडरेशन (All-India Scheduled Castes Federation) च्या दि. १३ डिसेंबर १९४५ च्या सभेत ‘जयभीम’ या अभिवादनपर घोषवाक्यास यापुढे आपल्या राजकीय-सामाजिक (तेव्हाचे SCF-SSD) संघटनेचे घोषवाक्य म्हणून मान्यताही देण्यात आली.

‘जय भीम’च्या प्रवर्तकाला त्यांच्या जयंतीनिमित्त पुनश्च विनम्र अभिवादन व सप्रेम जयभीम ! 🙏💙

टीप : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जो पक्ष दिला आहे त्या ‘रिपब्लिकन पक्षाची’ आधारशीला ही ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ व तद्नंतर अस्तित्वात आलेल्या ‘अखिल भारतीय दलित फेडरेशन’ च्या तत्वे, धोरणं व कार्यक्रमांवर आधारित आहे.
प्रशिक आनंद
6 जाने. 2021

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here