Home विशेष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या पुढाकाराने ३५ वर्षांनंतर वडगावातील खुल्या जागेवर सौंदर्यीकरणाला सुरुवात...

नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या पुढाकाराने ३५ वर्षांनंतर वडगावातील खुल्या जागेवर सौंदर्यीकरणाला सुरुवात वडगाव वासीयांनी सामाजिक एकोप्याचा आदर्श निर्माण केला

21
0

 

प्रतिकार

(निलेश पाझारे)

वडगाव प्रभागातील वडगाव येथे श्रीराम हनुमान मंदिर व पंचशील ध्वजाच्या परिसरामध्ये हजारो चौरस फूट खुली जागा अनेक वर्षापासून अडगळीत पडलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असून वडगाव मध्ये प्रवेश करताक्षणी या अस्वच्छतेचे दर्शन होते. अनेक वर्षांपासून दोन समाजामधील गैरसमजुतीमुळे या जागेचा विकास थांबलेला होता.नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मनपाचे तत्कालिन आयुक्त संजय काकडे यांना सोबत घेऊन मानाजी नगर येथील दत्त मंदिरात दोन्ही बाजूच्या लोकांची बैठक बोलावली.बैठकीमध्ये सर्व गैरसमज दूर झाल्यानंतर तात्काळ निधी मंजूर करण्याचे आश्वासन आयुक्त काकडे यांनी दोन्ही बाजूच्या मंडळींना दिले.यानंतर या ठिकाणी १७ लक्ष रुपयाच्या विकास कामाला मंजुरी देण्यात आली.आज या कामाचे भूमिपूजन चंद्रपूरच्या महापौर राखी कंचलवार यांच्या हस्ते,वडगावच्या नगरसेविका सुनीता लोढीया, नगरसेवक देवानंद वाढई यांच्या उपस्थितीत करण्यात आले. श्री हनुमान मंदिर ट्रस्ट चे अरुण येरगुडे, वामन चौधरी, सुभाष पाऊणकर , भाविक येरगुडे, गजानन चौधरी,दत्तू उपरे,बाळू बोरीकर,निखाडे,गजानन येरगुडे,सदाशिव पाऊणकर, बौद्ध समाज मंडळाचे चारुशिला ब्राह्मणे,निर्मला नगराळे,के.जे. खैरे,भजनदास डोईफोडे, विनायक इंगळे,अशोक मुळे,भालचंद्र ब्राम्हणे ,पि.एम.जाधव ,युवराज वाळके साहेब ,दुर्गे, प्रशांत चहांदे तसेच वडगावातील शेकडो नागरिक व जन विकास सेनेचे घनश्याम येरगुडे, देवराव हटवार, मनिषा बोबडे ,अक्षय येरगुडे, आकाश लोडे ,गीतेश शेंडे ,प्रफुल बैरम इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
समाजामध्ये उच्चशिक्षित नागरिक असतानाही अनेक ठिकाणी
खुल्या जागेमध्ये मंदिर व पंचशील ध्वज लावण्यावरून सुप्त मतभेद असतात.अनेकवेळा त्याचे उघड प्रदर्शन सुध्दा होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर सर्व समाजासाठी केलेल्या कामाबद्दल पुरेशी जागरुकता नसणे हे या मतभेदांचे मूळ कारण आहे. मात्र शिक्षित नागरिक तुलनेने कमी
असलेल्या वडगाववासीयांनी याबाबत एक वेगळा आदर्श निर्माण केला.श्रीराम हनुमान मंदिर व पंचशील ध्वज असलेल्या परिसरामध्ये आपले मतभेद बाजुला ठेवून विकासकामाला सुरूवात केली व सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले. वडगावातील नागरिकांच्या कृतीतून बोध घेऊन समाजातील नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्यास छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या सर्वसमावेशक समाजाची निर्मिती करण्यात हातभार लागेल अशी अपेक्षा यावेळी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी व्यक्त केली.
वडगावच्या विकासाबाबत नगरसेवकांच्या भूमिकेमध्ये एकवाक्यता असून पुढील वर्षभरात प्रभागातील सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी महापौर राखी कंचलवार,नगरसेविका सुनीता लोढीया,नगरसेवक देवानंद वाढई व पप्पू देशमुख यांनी दिले.

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here