प्रतिकार
(विशेष प्रतिनिधी)
सनियंत्रण समितीसाठी सदस्यांचे नामनिर्देशन आमंत्रित
चंद्रपूर, दि. 4 जानेवारी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे अंतर्गत हाताने मौला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम 2013 च्या कायद्याची अंमलबजावणीकरिता सल्ला देणे व संनियंत्रण ठेवणे, संबंधित यंत्रणेशी समन्वय साधने यासाठी राज्य नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
सदर समितीमध्ये हाताने मैलासाफ करण्यास प्रतिबंध करणे, पुनर्वसन करणे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था अथवा समाजाचे प्रतिनिधित्व करत असणारे राज्याचे रहिवासी असे चार व्यक्तीचे नामनिर्देशन शासनाने करावयाचे असून यामध्ये दोन महिलांचा समावेश करावयचा आहे. तरी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांनी त्यांचा प्रस्ताव कार्यालयात सादर करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.