Home Breaking News महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास 11 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास 11 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

42
0

प्रतिकार

चंद्रपूर, दि. 4 जानेवारी : कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी आता 11 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात. ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी 11 जानेवारीपुर्वी आपले अर्ज पोर्टलवर भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.
0000

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here