राजुरा…
विशेष प्रतिनिधि …
ग्रामपंचायत ची थकित रक्कम असताना येडे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला चुकीचा निर्णय…
तो उमेदवार अपात्र ठरल्यास पुढची सहा वर्षे लढवू शकणार नाही कोणतीही निवडणूक.
हायकोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहे सर्वांचे लक्ष!
राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा आखाळा सुरू झाला आहे. निवडणूक जरी १६ जानेवारी रोजी असली तरी राजुरा तालुक्यातील चिंचोली (बु) या ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ उमेदवाराच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला ,त्यांचेकडे लाखो रुपये ग्रामपंचयतीचे थकित रक्कम असताना मात्र निवडणूक अधिकारी श्री येड़े साहेबांनी राजकीय दबावा पोटी आक्षेप घेणाऱ्या अर्जदारचा विचार केला नाही ,ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज भरतांना त्यांचेकडे कोणतीही बाकी नसावी आशा प्रकारचे जीआर असताना चिंचोली बु,येथील उमेदवार यांचेकडे लाखो रुपये थकित असल्याचा पुरावा आक्षेप घेणारे श्री शंकर धनवलकर यानी पुरावे देवून ,सुद्धा त्या पुराव्याकडे दुर्लक्ष केले,यापूर्वी सुद्धा या उमेड़वारचे ग्रामपंचायत सद्स्यत्व रदद् केले होते .आता पनह निवडनुकिसाठी अर्ज भरला आहे,या उमेद्वाराच्या हट्टापाई काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज होऊंन दुसऱ्या गटात मिळाले आहे.या आयत्या सन्धिचा फायदा विरोधकाना मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.या प्रकाराबाबत तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
तसेच राजकीय पक्षाच्या या उमेदवाराने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे. त्याविरुद्ध नामिनेशन फार्मच्या छाननीच्या वेळी ‘त्या’ उमेदवाराच्या उमेदवारी विरुद्ध आक्षेप घेण्यात आला. परंतु संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अतिक्रमण संबंधित असलेल्या केस पुराव्याची छाननी न करता चुकीचा व बेकायदेशीररीत्या ‘त्या’ उमेदवाराच्या बाजुने निर्णय दिला. त्यामुळे त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले असून त्या उमेदवाराचा नाॅमीनेशन फार्म रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने अशा प्रकारे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या उमेदवारांचे सदस्यत्व रद्द केलेले आहे. त्यामुळे सदर प्रकरणात निवडणूकीपुर्वीच ‘त्या ‘ उमेदवाराचा उमेदवारी फार्म रद्द होतो की काय? ‘जर फार्म रद्द झाला तर ‘त्या’ उमेदवाराला पुढील सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीला उभे राहता येणार नाही’ त्यामुळे राजुरा तालुक्यातील जनतेचे लक्ष आता हायकोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहे.
ग्रामपंचायत ही मिनी आर्थिक बैंक असून ,अनेक प्रकारचे काम करून घेता येते,त्यामुळेच असे भ्रष्ट लोक निवडणुकीत उभे असतात,अधिकारी यांचेशी साटेगोटे असल्याने,मोठा गैरव्यवहार करणारा म्हणून प्रसिद्ध आहे.अशा चुकीच्या निर्णयामुळे लोकशाही धोक्यात येते.या अधिकाऱ्यांबाबत पंचायत समिति कार्यालयात माहिती घेतली असता यांचेकडे कोणतेही काम नसल्याचे सांगण्यात आले,है महाशय बीडीओ च्या अति विस्वासतले असल्याची माही पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्यानि सांगितले.या वरुण स्प्ष्ट हॉट आहे ,है अधिकारी राजकीय दबावापोटी निणर्य दिला असल्याचा आरोप होत आहे.
प्रतिकार न्यूज़