प्रतिकार
राजुरा (विशेष प्रतिनिधी)
* विदर्भ स्तरावर शिवाजी विद्यालय तीन विभागात प्रथम
राजुरा.
राज्य शासनाच्या क्रिडा व युवक सेवा उपसंचालक यांनी आयोजित केलेल्या राज्य स्तरीय ऑनलाईन युवा महोत्सवात राजुरा शहरातील गणमान्य शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विदर्भासाठी झालेल्या तीन स्पर्धामध्ये अव्वल क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी मुख्याध्यापक केवाराम डांगे, रजनी शर्मा, कृतीका सोनटक्के यांनी अथक परिश्रम घेतले. या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
संपूर्ण राज्यात क्रिडा व युवक सेवा विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतीच जिल्हा आणि त्यानंतर विदर्भ स्तरीय स्पर्धा झाली. यात राजुरा शहरातील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेतला. त्यात लोकनृत्य, लोकगीत व एकांकिका या तिन्ही स्पर्धेत शिवाजी विद्यालयाने विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला. लोकनृत्य स्पर्धेत अनुराधा बोधे, प्रियंका कांबळे, साक्षी तुराणकर, सीमा रागीट,शिवानी कुबडे, परिणीता देवगडे, श्रेया दिवसे,आंचल विधाते, सुहानी गेडाम यांनी भाग घेतला. लोकगीत स्पर्धेत रामेश्वरी पंधरे, शबा चाऊस, भूमिका गुरनुले, अपर्णा चौधरी, प्रशिका मालखेडे, प्रणाली बताशंकर यांचा सहभाग होता. एकांकिका स्पर्धेत सुहानी पिंगे, आचल चटप, विजया रासेकर, प्रतिमाकुमारी पासवान,भूमिका हिंगाणे, काजल ठेंगणे, खुशी मडावी व गणेश निकोडे यांनी भाग घेतला.
या स्पर्धामध्ये लक्ष्मीनारायण किन्हीकर, कपिल ईटनकर, ब्रम्हदेव कुळमेथे,प्रदीप कोवे, अनिल काकडे,रत्नाकर नक्कावार, रामकृष्ण चहारे,अन्वर अली, स्वाती मेश्राम या वाद्यवृंद व गायन पथकाने साथ दिली. पर्यवेक्षक वसंत पोटे, अमृता धोटे, टी.एस,बनपूरकर, हरिश्चंद्र विरूटकर, एस.एस. दुधगवळी, बोंडे,डी.बी.धोपटे,आर.एस. चहारे, आर.एन.आडे, जी.बी. कडूकार,ए.एम. वनकर, व्ही.एम. बोलमार यांनी अभिनंदन केले आहे.