Home आपला जिल्हा चंद्रपूरमधील 1788 गावांची अंतिम पैसेवारी 48 पैसे  50 पेक्षा जास्त पैसेवारी...

चंद्रपूरमधील 1788 गावांची अंतिम पैसेवारी 48 पैसे  50 पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या 277  50 पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या 1511

3
0

प्रतिकार

चंद्रपूर, दि. 31 डिसेंबर : सन 2020-21 या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1788 गावांतील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 48 पैसे असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जाहिर केले आहे. 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या 1511 असून 50 पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या 277 आहे. तर पैसेवारी जाहिर न केलेल्या गावांची संख्या 45 आहे.
जिल्ह्यात एकूण गावांची संख्या 1836 गावे आहेत. त्यापैकी खरीप गावांची संख्या 1833 तर रब्बी गावांची संख्या 3 आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पीक नसलेल्या गावांची संख्या 45 आहे.
जिल्ह्यातील तालुक्यांची सरासरी अंतिम पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे. चंद्रपूर तालुका 47 पैसे, बल्लारपूर 47 पैसे, राजुरा 48 पैसे, कोरपना 47 पैसे, जिवती 47 पैसे, गोंडपिपरी 54 पैसे, पोंभुर्णा 61 पैसे, मुल 58 पैसे, सावली 48 पैसे, चिमुर 46 पैसे, सिंदेवाही 46 पैसे, ब्रम्हपुरी 45 पैसे, नागभीड 47 पैसे, वरोरा 45 पैसे व भद्रावती तालुक्याची सरारी 47 पैसे जाहिर करण्यात आली आहे.
००००००

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here