दिलासादायक बातमी
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यात 54 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.. यातील जवळपास 50 पत्रकारांचा मृत्यू कोरोनानं झाला आहे.. कोरोनानं निधन झाल्यास संबंधित पत्रकाराच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत देण्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती.. मात्र 54 पैकी एकाही पत्रकाराच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून दमडीही मिळाली नाही..
या पार्श्वभूमीवर दिल्लीहून एक दिलासा देणारी बातमी आली आहे.. ज्या पत्रकाराचं निधन कोरोनानं झालंय अशा पत्रकारांच्या नातेवाईकांना केंद़ सरकार आर्थिक मदत देणार आहे.. Journalist welfare scheme अंतर्गत ही मदत दिली जाणार आहे.. मृतमुखी पडलेला पत्रकार हा अधिस्वीकृती धारक पत्रकार असलाच पाहिजे असे कोणतेही बंधन नाही.. मात्र दिवंगत व्यक्ती पत्रकार होता याचे पुरावे द्यावे लागतील.. शिवाय मृत्यूचे प़माणात आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागेल..
अर्ज Additional Director General, press facilities, PIB यांच्या नावाने [email protected] या मेलवर पाठवायचा आहे…
राज्यात ज्या पत्रकाराचे कोविड 19 ने निधन झाले आहे त्यांच्या नातेवाईकांनी अथवा मित्रांनी वर नमूद केलेल्या मेल आयडीवर आपला अर्ज पाठवावा असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे..