Home राजकारण ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोना सुट्टीवर ?निवडणूक अधिकारी बिना मास्कनी फार्म स्वीकारतो !!

ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोना सुट्टीवर ?निवडणूक अधिकारी बिना मास्कनी फार्म स्वीकारतो !!

1
0

राजुरा ..

राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काही कर्मचारी बांधवांची निवड करून त्यांचेकडे जबाबदारी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या कार्यालयात नागरिक मोठ्या संख्येने ग्राम पंचायत करीता उमेदवारी अर्ज भरण्यास येत आहे,कोरोनाच्या काळात आपली जबाबदारी काय याचे भान सुद्धा या पवार साहेबाना दिसत नाही ,तोंडाला मास्क न बांधता लोकांचे ,नागरिकांचे फार्म स्वीकारत आहे,काय ग्रामपंचायत काळात कोरोनाला सुट्टीवर पाठविला की कोरोना संपला !ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे ,आणि अधिकारी जर असे वागले तर इतरांनी काय बोध घ्यावा ,याबाबत अधिकारी साहेबानी अधून, मधून ज्या ठिकाणी फार्म भारतात त्या ठीक भेट देने गरजेचे आहे,निवडणूक जरी 28 ग्रामपंचायत मध्ये होत असली तरी प्रत्येक गावात 20 ते 25 लोक उमेदवारी अर्ज भारतात त्यामुळे तहसिल कार्यालयात गर्दी दिसून येत आहे.या वर्षी सेतू केंद्र संचालक यांनी उमेदवारीची आर्थिक लूट केल्याचे नागरिकांच्या चर्चेतून ऐकाला मिळत आहे,प्रत्येक सेतुवर असलेली गर्दी,सर्वाना आनलाईन कागदपत्र भरावे लागत असल्याने अनेकांची दमछाक होत आहे,अशातच अनेक ग्रामसेवक मुख्यलयी राहत नसल्याने,कागदपत्राची जुळवाजुळव करताना पहिली परीक्षा उत्तीर्ण करावी लागत आहे. नवीन फार्म भरणाऱ्या सर्व नागरिकांना मंगलमय सदिच्छा .

प्रतिकार न्युज

 

 

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here