राजुरा …
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते ,या वेळेस सुद्धा वे ब्रिज 50 टन क्षमतेचा मोजमाप करणारा काटा ,त्यातून होणार खर्च चार आण्याची कोंबडी ,बारा आण्याचा मसाला खर्च होत आहे.या पूर्वी हाच वजन् माप काटा वादग्रस्त ठरला होता त्याची तक्रार सुद्धा झाली होती ,या ठिकाणी कार्यरत असलेले सुरेश खरतड मरण पावले,त्यात त्यांना मोठा धक्का बसला होता.त्यांचेकडून बांधकामाचे आस्तिमेंट वाढवून ,त्या मोजमाप करणारा काटा जेव्हा लावला तेव्हा 12 ते 13 लाख खर्च केल्याचे सांगितले होते, पुन्हा तोच काटा बदलवून मागे असलेला पुढे करण्याबाबत चर्चा सुरू आहे.पुन्हा त्या काट्यावर लाखो रुपये खर्च होणार असल्याची माहिती समोर येत आहे.म्हणून मनतात चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला ही गावरानि मन आहे ती तंतोतंत खरी ठरत आहे,आधीच दलाली बंद मुळे मार्केट मध्ये माल येत नाही ,व्यापारी घरीच सोयाबीन खरेदी करीत असून ,काही जिनिंगवर सुद्धा सोयाबीन खरेदी सुरू आहे, एकंदरीत बाजार समितीला या वर्षी मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.