Home क्राइम पोलिसांची सेक्स रॅकेट वर कारवाई – मॉडेल सोबत फिल्मी कलाकारांचा देखील समावेश

पोलिसांची सेक्स रॅकेट वर कारवाई – मॉडेल सोबत फिल्मी कलाकारांचा देखील समावेश

4
0

                क्राईम ब्रांच चे डीसीपी अकबर  पठाण यांनी दिलेल्या माहिती नुसार त्यांना मुंबई च्या इस्टर्न सब रोड येथे सेक्स रॅकेट सक्रिय असून त्यात अभिनेत्री आणि मॉडेल्स चा समावेश असल्याची माहिती मिळाली होती.या महितीच्या आधारे त्यांनी पंटर पाठवून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेशी संपर्क साधून तिला अभिनेत्री किंवा मॉडेल उपलब्ध करून देण्याची मागणी केली.सुरवातीला या महिलेने तिला याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले.मात्र काही दिवसांनी तिचा यांच्यावर विश्वास बसला आणि तिने यांच्याशी संपर्क साधला आणि पैशाची बोलणी करून एका रात्री साठी ५५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
                 त्या महिलेने या बनावटी ग्राहकांना यिन महिला दाखवण्यात येतील त्यातून तुम्हाला एक निवडायची आहे.असे बोलून त्यासाठी घाटकोपर मधील एक हॉटेल बुक केले. ती त्या तीन महिलांसह हॉटेल मध्ये आली.यातील एक भोजपुरी फिल्म मधली प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने टीव्ही मालिकेत ही काम केलं आहे.तर दोन मॉडेल्स होत्या. ज्यावेळी ही महिला अभिनेत्री आणि मॉडेल्स ला दाखवत होती.त्यावेळी क्राईम ब्रांच च्या युनिट 7 ने तिथे रेड टाकली.पोलिसांनी या दलाल महिलेला अटक केली आहे. पण अद्याप या रॅकेट मागील मास्टर माईंड पोलिसांना गवसला नाही. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. दलाल महिला या महिलांकडून ३% कमिशन घेत होती.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here