शिल्पा मेक्षाम
नागपूर
मुकी फुले
तरू उद्यानी वेली
सुगंधी मुकी फुले
रंगीत गुच्छ शानदार
कळी पाकळी डुले….!!
गुलाब पंकज जाई जुई
जास्वंद चाफा गर्द राई
सूर्यफुले झेंडू रान सोनेरी
प्राजक्त धवल केशरी….!!
चौफेर सुवास बोलका
उमलण्यापूर्वी तोडू नोका
धरतीत रोवा मोगरा
केसात माळला गजरा… !!
मकरंद शोषती भुंगे
भ्रमरती चोहिकडे रांगे
सडा पाडती अंगणी
निराश सजनी केविलवाणी…!!
प्रेम करावे सर्वांनी
संगीत बरसे पानोपानी
फुले मुले गोजिरवाणी
जुळी हृदय प्रीत भावनांनी… !!
संकलन
शिल्पा मेक्षाम
नागपूर