Home शैक्षणिक आविष्कार फाऊंडेशन तर्फे गौरव कुलसंगे यांचा सत्कार ,

आविष्कार फाऊंडेशन तर्फे गौरव कुलसंगे यांचा सत्कार ,

5
0

राजुरा…

आविष्कार फाऊंडेशन तर्फे गौरव कुलसंगे यांचा सत्कार…

 

राजुरा तालुक्यातील कामगार नगर येथील गुणवंत विद्यार्थी गौरव रंगराव कूलसंगे यांचा आविष्कार फाऊंडेशन या सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या राजुरा शाखेतर्फे सत्कार करण्यात आला.
गौरव कूलसंगे याने एम.बी.बी.एस. च्या पात्रता परीक्षेत उत्कृष्ठ गुण मिळवून तो वैद्यकिय शिक्षण प्रवेशा साठी पात्र ठरला. गौरव हा येथील धोपटाळा कामगार सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रंगराव कूलसंगे यांचा मुलगा आहे. आदिवासी समाजातून असूनही गुणवत्तेत अव्वल आल्याबद्दल आविष्कार या सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व क्रिडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे पुस्तक, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबा कोडपे, सुधीर झाडे, अनिल पेंढारकर, सुषमा शुक्ला, विजया कोडापे, स्वतंत्रकुमार शुक्ला, रंगराव कूलसंगे, लता कूलसंगे ईत्यादी उपस्थित होते.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here