Home राज्य महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने संविधान चौकात मनुस्मृती दहन संपन्न!*

महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने संविधान चौकात मनुस्मृती दहन संपन्न!*

5
0

*महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने संविधान चौकात मनुस्मृती दहन संपन्न!*

*महात्मा फुले समता परीषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा मनुस्मृती दहन कार्यक्रम व धरणे आंदोलन संविधान चौक नागपुर येथे करण्यात आले! डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले, त्या नंतर महात्मा फुले समता परीषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांनी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळुन, बहुजनांना, महिलांना धर्मांधतेच्या जोखडातुन मुक्त केले! पण आजची मनुस्मृती ही धर्मांध राजकीय विचारातुन नवनवे रूप घेवुन, बहुजनांना छळत आहे! केंद्र सरकारचे नवे कृषि कायदे, हे त्या मनुस्मृतीचे स्वरूपच आहे! शेतकरी आपला लढा लढत आहे! त्याला आमचे समर्थन असुन, असे कृषि कायदे मनुस्मृतीचाच नवा अवतार असल्यामुळे आम्ही त्यांचीही जाहीर होळी करतो.
त्यानंतर राष्ट्रवादी ओबीसी सेल चे प्रदेशाध्यक्ष मा. ईश्र्वर बाळबुधे यांनी, मनुस्मृती ही महिला व बहुजनांसाठी महाकलंक होती! बहुजनांचे अधिकार नष्ठ करून, त्यांना या मनुस्मृतीने गुलाम केले होते! महात्मा फुले यांनी मनुस्मृती जाळुन टाका असे सांगीतले होते! बाबासाहेबांनी ती प्रत्यक्ष पेटवून खर्‍या अर्थाने बहुजनांच्या धर्मांधतेच्या बेड्या तोडलेल्या आहेत! आज किंवा भविष्यात अशा मनुस्मृतीचे कितीही विचार, कितीही कायदे आले, तरी आम्ही ते जाळणारच! पण बहुजनांच्या संविधानाचे प्राणपणाने जतन व संरक्षण करू असे विचार त्यांनी मांडले!
त्यानंतर प्रत्यक्ष मनुस्मृती ग्रंथाचे सर्व पदाधिकारी ,महिला व कार्यकर्त्यांनी आग लावुन मनुस्मृतीचे दहन करण्यात आले!
या मनुस्मृती दहन कार्यक्रमासाठी, आरिफ काझी,जगदीश जुनगरी, विजय लोनबले,राजु साखरकर,विष्णु नागरीकर,अरूण भेदे,जयंत मानकर,निळकंठ पिसे, विनय डहाके, धर्मेंद्र खमेले, रूद्रा धाकडे, संदिप मेंढे, विशाल हजारे,पुंडलिक नागतोडे, अलका कांबळे, निशा मुंडे, साधना श्रीवास्तव,रेखा कृपाले, अॅड साधना येळणे,विद्या बहेकर, कविता मुंगले, किरणताई कडु, आणि समता परीषदेचे पदाधिकारी, महिला, विद्यार्थीनी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होत.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here