अवैधरित्या जंगलातून रेती भरून नेणारे ट्रक्टर वनकर्मचार्यानी केले जप्त
राजुरा(प्रतिनिधी)
सुमठाणा जंगलातील कक्ष क्रमांक 154 मधील नाल्यातून अवैधरित्या रेती भरून वाहतूक करणाऱ्या सुमठाणा येथील सतीश धंदरे याचे मालकीचे ट्रक्टर आज पहाटे वन कर्मचाऱयांनी पकडून जप्त करण्यात आली
या नियत क्षेत्रातून रेतीची तस्करी होत असल्याची माहिती असल्याने त्यावर पाळत ठेऊन गस्त करीत असताना कक्ष क्रमांक 154 मधील नाल्यातून रेती भरून नेत असताना वन कर्मचाऱयांनी पकडून ट्रक्टर वन डेपोत जमा कारण्यात येऊन वन कारवाई करण्यात आली आहे
ही कारवाई क्षेत्र सहाय्यक श्रीनिवास कटकू,वनरक्षक मीरा राठोड,वनरक्षक संजय चौबे,वनमजुर प्रभूदास धोटे शामराव खेळेकर, जीवन कावळे यांनी केली पुढील कारवाई उपवन संरक्षक अरविंद मुंढे,उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल वन क्षेत्रपाल विदेशकुमार गलगट यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहायक श्रीनिवास कटकू करीत आहे.
प्रतिकार न्युज