प्रतिकार
चंद्रपूर – शहरातील चर्चित मनोज अधिकारी हत्याकांड मधील शेवटची आरोपी व सूत्रधार सीमा दाभरडे यांना आज स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
29 सप्टेंबरला दाताला मार्गावरील सिनर्जी वर्ड मध्ये सामाजिक कार्यकर्ता मनोज अधिकारी यांच्या राहत्या फ्लॅट मध्ये कुऱ्हाडीने वार करीत हत्या करण्यात आली होती, या प्रकरणात नगरसेवक अजय सरकार, देबनाथ, रवी बैरागी यांना अटक करण्यात आली होती मात्र या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार सीमा दाभरडे नामक युवती हत्या झाल्यापासून पसार झाली होती.
24 डिसेंम्बरला ती चंद्रपूरला येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता सीमाला त्यांच्या राहत्या घरून अटक करण्यात आली, सीमाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने अनेकदा फेटाळला होता.
पोलिसांना या हत्याकांडात अजून नवीन काय माहिती मिळणार हे तर चौकशीनंतर कळेल, मिळालेल्या माहितीनुसार सीमाची 26 डिसेंम्बर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.