राजुरा …
राजुरा बामनवाडा रोडवर प्रवाशाचा कोंडमारा !रस्ते दुरुस्त केव्हा होणार !एखादी जीव गेल्यावर !
राजुरा बामनवाडा रोडवर रस्ते दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे .काम करणाऱ्या ठेकेदारांनी रस्त्याच्या बाजूला जाण्यासाठी तात्पुरता रस्ता तयार करायला पाहिजे ,परंतु कासवगतीने काम करणारे ठेकेदाराला जनतेचे काय घेणं देणं ,आज सकाळी लग्नाची वरात नाचत ,वाजत ,गाजत निघाली ,परंतु ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्याच बाजूला जाण्यायेण्या साठी रस्ता बरोबर नसल्याने ,मंगल कार्यालयाकडे जाणारी वरात रस्त्यातच त्यांची एक गाडी रस्त्यावर अडकली त्यामुळे ,दोन्ही बाजूने वाहन चालक अडकून रस्त्यावरच राहावे लागले ,काही लोकांनी ज्यांना रस्ता माहीत आहे अश्या टू व्हीलर चालकांनी कालणीतून गाड्या घेऊन निघाले ,परत तोही रोड अरुंद त्याही ठिकाणी एक आटो आला तर मोटार सायकल निघणे कठीण झाले होते.असा जीवघेणी प्रवास राजुरा ,बामनवाडा रोडवर मागील आठ ,नऊ महिन्यापासून सुरू आहे,याच रोडवर माजी आमदार सुदर्शन भाउ निमकर चुनाळा येथे येणे जाणे करतात ,पण तेही लक्ष देतात की नाही भाऊंनाच माहीत,आता त्या परिसरातील निवडणुका लागल्याने,महिला पुरुषयांची ये जा दिवसभर असते ,रात्रोच्या वेळी अपघात होऊन विवीत हानी होण्याची भीती व्यक्त होत आहे .या पूर्वी या रोडवर अनेकांनी आपले जीव गमावले आहे.आरा तरी निवडणुकीच्या काळात रोड दुरुस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
प्रतिकार न्युज