Home Breaking News घरासमोर बसलेल्या गोर्‍याची वाघाने केली शिकार; दोन दिवसात दुसरी घटना.

घरासमोर बसलेल्या गोर्‍याची वाघाने केली शिकार; दोन दिवसात दुसरी घटना.

42
0

चिमूर:- घराच्या सामोर बसुन असलेल्या गोर्‍याची सोमवारी रात्री वाघाने शिकार केली जनावर मालक मंगळवार ला सकाळी गोरा दिसत नाही म्हणून घराला लागुण असलेल्या शेतात गोर्‍याला पाहन्यासाठी गेला असता गोरा वाघाने अर्धा खाल्लेला मृतावस्थेत आढळून आला तो गोरा शेतकरी दिवाकर नागोसे यांचा आहे. हि घटना नगर परिषद हद्दीतील मानीक नगर दुर्गा माता मंदीर परिसरात घडली.

      
   पशु मालक दिवाकर नागोसे यांचे घर दुर्गा मंदीराला लागुन आहे काही जनावरे गोठ्यात बांधुन होती तर गोरा घराच्या समोर बसुन होती सोमवार ला मध्यरात्री दरम्यान गोर्‍याने वाघाकडे बघुन मंदीराला लागुन असलेल्या शेताकडे पळ काढला दरम्यान वाघाने शेतात गोऱ्याचा बळी घेतला. मंगळवारला सकाळी गोरा दिसत नाही म्हणून गोर्‍याला पाहन्यासाठी शेतात गेला असता त्याला अर्धवट खाल्लेला गोरा दिसला याची माहीती नागोसे यांनी वनविभागाला दिली वन विभागाने घटना स्थळाचा पंचनामा केला. वाघाने जनावराची शिकार करन्याची दोन दिवसातील दुसरी घटना आहे यापूर्वी दोन दिवसा पूर्वी याच घटना स्थळावर वाघाने प्रकाश निखाते यांची गाबन गाय मारली होती. वाघाला पाहन्यासाठी एक कॅमेरा लावला होता मात्र वाघ कॅमेरात आला नाही परिसरात चार कॅमेरे लावनार असल्याचे वन विभागाने सांगीतले गोरा वाघाने मारल्याने अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे गोऱ्याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पशु मालक नागोसे यांनी वनविभागाला केली आहे.

         “नागरी वस्ती परिसरात लाईट ची व्यवस्था नाही नागरीकांना ये जा करताना अंधारातुन मार्ग शोधावा लागतो शहरातील मानीक नगर पावसी आंबा दुर्गा माता मंदीर परिसरात वाघाने दोन दिवसात दोन जनावरे मारल्याने नागरीकांत भितीचे वातावरण तयार झाले आहे सायंकाळच्या व सकाळच्या दरम्यान फिरणे कठीण झाले आहे वाघाने जंगल सोडुन शहरात धाव घेतली आहे त्यामुळे मानव वन्य प्राणी संघर्ष होन्याची शक्यता नाकारता येत नाही वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.”

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here