Home विशेष बर्फवृष्टीमुळे आलेल्या शितलहरीचा तीव्र प्रभाव विदर्भात मंगळवारीही दिसून आला ,विदर्भात थंडीची लाट...

बर्फवृष्टीमुळे आलेल्या शितलहरीचा तीव्र प्रभाव विदर्भात मंगळवारीही दिसून आला ,विदर्भात थंडीची लाट कायम…

39
0

विदर्भात थंडीची लाट कायम, नागपूर @ ८.६

शिल्पा मेश्राम
नागपूर कामठी|

नागपूर : उत्तर भारतात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे आलेल्या शितलहरीचा तीव्र प्रभाव विदर्भात मंगळवारीही दिसून आला. सोमवारच्या तुलनेत उपराजधानीच्या किमान तापमानात थोडी वाढ अवश्य झाली, परंतु बोचरे वारे व हवेतील गारठ्याने नागपूरकरांची आजही चांगलीच परीक्षा घेतली.

थंडीच्या लाटेने नागपूरसह अख्ख्या विदर्भालाच कवेत घेतले आहे. सलग तीन दिवसांपासून नागपूरचा पारा दहा अंशांच्या खाली आहे. काल नीचांकी ८.४ अंशांवर गेलेला पारा आज किंचित वाढून ८.६ अंशांवर आला. गोंदिया येथे लागोपाठ चौथ्या दिवशी विदर्भात सर्वात कमी म्हणजेच ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

याशिवाय यवतमाळ (८.५ अंश सेल्सिअस), गडचिरोली (९.० अंश सेल्सिअस), अकोला (९.६ अंश सेल्सिअस) व चंद्रपूरवासीही (९.६ अंश सेल्सिअस) जिल्हेही कडाक्याच्या हैराण आहेत. शहरात दिवसभर बोचरे वारे व गारठा जाणवला. सायंकाळी व रात्री पडणाऱ्या दवांमुळे वातावरण आणखीणच गारठते. थंडीचा सर्वाधिक फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसतो आहे. प्रादेशिक हवामान विभागाने थंडीची लाट अणखी आठवडाभर राहणार असल्याचे सांगितले आहे ़

प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दिवसभर गार वारे अंगाला झोंबतात. सायंकाळ होताच गारठा आणखी वाढतो. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता सध्यातरी वैदर्भींची थंडीपासून सुटका होण्याची शक्यता कमीच आहे. विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी गोंदिया येथे सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली.

विदर्भात उशिरा का होईना थंडीची तीव्र लाट आली. नागपूरसह सर्वच शहरांमध्ये कडाका वाढला असून, यंदाच्या मोसमात उपराजधानीचा पारा प्रथमच ८.७ अंशांपर्यंत घसरला आहे. या आठवड्यात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे दोन दिवसांपासून विदर्भात कडाक्याची थंडी जाणवत आहे. गारठ्यामुळे पाऱ्यात दिवसेंदिवस घसरण होत आहे. हवेतील गारठ्यामुळे दिवसभर हुडहुडी जाणवते. सायंकाळ होताच गारठा वाढू लागतो. अचानक थंडी वाढल्यामुळे एसी बंद झाले असून, पंख्याचीही स्पीड कमी झाली आहे. उत्तर भारतात बर्फवृष्टी आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने, विदर्भातही थंडीचा मुक्काम लांबणार आहे. नववर्षापर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले आहे.

संपादन : शिल्पा मेश्राम

नागपूर कामठी

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here