चंद्रपूर…
कापूस उत्पादक शेतकरी बांधवाना बोगस बियाणे विक्री केले,त्यामुळे शेतकरी हतबल झाले,ज्या कंपनीने बोगस बियाणे तयार करून शेतकरी बांधवाना विक्री केले ,त्या शेतकरी बांधवांच्या शेतात जेवढा खर्च केला तो सुद्धा निघाला नाही,
मार्च 2020ला कोरोनाच्या काळात ,सर्व व्यवहार बंद होते ,मग कापूस बियाणे,सोयाबीन व इतर बियाणे तयार करताना या कंपनीच्या कामावर कोण काम करीत होते, या कंपनीने केव्हा सिड तयार केले आणि सिड तयार करण्यासाठी कामगाराची तर आवश्यकता असते मग या कंपनीने पाकिट पॅकिंग कशी काय केली !या वर्षी जेवढ्या शेतकरी बांधवानी कापूस लावला त्या शेतावर कापसाचे झाड खूप वाढले ,पात्या ,फुले,बोन्ड सुद्धा आहेत पण बिजाई बोगस असल्याने झाडावर आलेली बोन्ड अळी, आणि अनेकांच्या कापूस झाडावर असलेले बोन्ड त्यातून कापूस निघतच नाही .या प्रकारामुळे,शेतकरी हतबल झाले आहेत ,अनेक ठिकाणचे शेतकरी ,वरिस्टाकडे लेखी तक्रारी देत आहे,प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असले तरी,शेतकरी बांधवाना आर्थिक मदत मिळाली पाहिजे ,नाहीतर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही ,राजुरा तालुक्यात बामनवाडा,चुनाला ,सातरी, चनाखा ,विहिरगाव ,मूर्ती ,नलफडी,सिंधी,धानोरा,कविठपेठ,चिंचोली,अतरगाव,सोंड ,असे अनेक गाव आहेत ,त्या गावातील शेतकरी उत्पन्न नसल्याने चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.काही ठिकाणी कृषी अधिकारी यांनी भेटी देऊन पाहणी केली ,पण मदतीचा पत्ता नाही .ज्या कंपनी ने बोगस बियाणे तयार करून शेतकरी बांधवाना विक्री केलीत अशा सिड कंपण्याविरोधात कारवाई होणे गर्जेचेच असल्याचं मत शेतकरी बांधव करीत आहे,
प्रतिकार न्युज