Home आपला जिल्हा महानगरपालिकेतील १७० कोटी रुपये किमतीची कामे संशयाच्या भोवऱ्यात -नगरसेवक पप्पू देशमुख यांचा...

महानगरपालिकेतील १७० कोटी रुपये किमतीची कामे संशयाच्या भोवऱ्यात -नगरसेवक पप्पू देशमुख यांचा पत्रकार परिषदेत आरोप

5
0

चंद्रपूर…

महानगरपालिकेतील १७० कोटी रुपये किमतीची कामे संशयाच्या भोवऱ्यात
-नगरसेवक पप्पू देशमुख यांचा पत्रकार परिषदेत आरोप

मनपातील घोटाळ्यांमुळे चंद्रपूरकरांच्या मनात संतापाची भावना

कोविड-१९ आपत्तीमुळे मुदतवाढ मिळालेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीने दिनांक २१.१०.२०२० रोजी झालेल्या सभेमध्ये स्वयंभू एजन्सीचे रुपये १७०० प्रतिटन दराची कचरा संकलन व वाहतुकीची निविदा रद्द केली. त्यानंतर ११ डिसेंबर २०२० रोजी स्थायी समिती मध्ये ठराव घेऊन त्याच स्वयंभू एजन्सीला रुपये २८०० प्रति टन दराने काम देण्यात आले.आधी सरळ दहा वर्षां करिता दिलेले काम नव्याने अप्रत्यक्षपणे सात वर्ष मुदत व तीन वर्षे मुदतवाढ अशाप्रकारे दहा वर्षासाठी देण्यात आलेले आहे.१७०० रुपये प्रति टन दराने दहा वर्षासाठी मनपाला एकूण ८० कोटीच्या जवळपास खर्च अपेक्षित होता.मात्र आता २८०० रुपये प्रति टन दराने मनपाला रुपये १४० कोटीच्या जवळपास खर्च दहा वर्षांमध्ये येणार आहे.प्रत्येक टन मागे ११०० रुपये दरवाढ झाल्यामुळे दहा वर्षात ६० कोटी रुपये आर्थिक भुर्दंड मनपाला बसणार आहे. मात्र याबाबत कोणतीही सविस्तर माहिती तपशिलासह देण्याचे स्थायी समितीच्या ठरावा मध्ये टाकण्यात आले.केवळ कंत्राटदाराला आर्थिक लाभ पोहोचविण्याच्या हेतूने हा घोटाळा झाल्याचा संशय असून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली.यावेळी बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका पुष्पाताई मुन,काँग्रेसचे नगरसेवक अमजद अली, नगरसेविका संगीता भोयर शहर विकास आघाडीचे नगरसेवक स्नेहल रामटेके, नगरसेविका मंगला आखरे जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे, आकाश लोडे, मनीषा बोबडे,अक्षय येरगुडे,गीतेश शेंडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू आखरे उपस्थित होते.यापूर्वी २०१३ मध्ये याच कामासाठी स्थायी समितीने घेतलेल्या ठराव मध्ये प्रत्येक वर्षानुसार खर्चाबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे.परंतु ११ डिसेंबर २०२० रोजी घेतलेल्या ठरावा मध्ये स्थायी समितीने वाढीव दराचे विश्लेषण करणारी कोणतीही माहिती देण्याचे टाळले.महानगरपालिकेने बायो मायनिंग रू.३.५० कोटींचे काम विश्वेश एजन्सीला दिले होते.या एजन्सीने काम करण्यास विलंब केला. त्यामुळे तिच्या बिलामध्ये कपात सुद्धा करण्यात आली. मात्र त्याच एजन्सीला कचरा व्यवस्थापन व प्रक्रियेचे रुपये ५९५ प्रति टन दराने एकूण पाच वर्षासाठी काम देण्यात आले.या कामासाठी जवळपास १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अशाच प्रकारे क्वारंटाईन सेंटरवर भोजन पुरवठा करणे व मालमत्तांचे मूल्यांकन चे अनुक्रमे पाच कोटी व ६.२२ कोटींचे कामात सुद्धा कंत्राटदारांना लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न महानगरपालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप करून
मनपातील जवळपास १७० कोटी रुपयांच्या विविध कत्रांटामध्ये झालेल्या घोटाळ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. महानगरपालिकेतील घोटाळ्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी लक्ष घालावे असे आवाहन यावेळी देशमुख यांनी केले तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.मात्र योग्य चौकशी व कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागून चंद्रपूरच्या जनतेला न्याय मिळवून देणार अशी भूमिका व्यक्त करून घोटाळेबाजांना प्रत्येक घोटाळ्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

संकलन
(प्रदीप उर्फ पप्पू देशमुख)

प्रतिकार न्युज

वरील बातमी शेअर करा …

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here