Home कृषी सिरोंचा तालुक्यात आविका मार्फत सर्व केंद्रावर एकरी 20 ते 25 क्विंटल धान...

सिरोंचा तालुक्यात आविका मार्फत सर्व केंद्रावर एकरी 20 ते 25 क्विंटल धान खरेदी करावे*

3
0

सिरोंचा…

सिरोंचा तालुक्यात आविका मार्फत सर्व केंद्रावर एकरी 20 ते 25 क्विंटल धान खरेदी करावे*

सिरोंचा तालुक्यात शेतकरी बांधव जास्त प्रमाणांत धान उत्पादन करित असतात. या वर्षी सुधा शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात धान उत्पादन घेतले आहे.
व ते धान 1 महिन्या अगोदर कटाई करुन सर्व शेतकरी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुधा आदिवासी विकास महामन्डळ मार्फत खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यास तयार होते परंतु आदिवासी विकास महामंडडाने एकरी 9 क्विंटल 60 किलो प्रमाणे धान खरेदी करन्याचे आदेश काडन्यात आले त्या मुडे सर्व शेतकरया मध्ये तिव्र असन्तोश पसरले आहे. व शेतकरी मात्र एकरी 25 ते 30 क्विंटल धान उत्पादन करतात . परंतु महामंडडाने काडलेल्या आदेशाने बकीचे धान विकयचे तरी कुठे असे प्रश्ण शेतकरया समोर पडलेला आहे.

मागिल वर्षी खरेदी केंद्रावर एकरी 16 क्विंटल धान खरेदी करण्यात आले होते या वर्षी मात्र 9 क्विंटल 60 किलो खरेदीने असंतोष पसरले आहे.
व त्याचा तोड्गा काडन्यासाठी सर्च धान उत्पादक शेतकरयानी आदिवासी विकास महामंडळा मार्फत आधार भूत धान खरेदी केंद्रावर प्रति एकरी किमान 20 ते 25 क्विंटल धान खरेदी करावे म्हणून आज सिरोंचा तालुक्यातील नारायणपुर येथी अहेरी सिरोंचा मुख्य रोडवर हजारो संख्येने शेतकरी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शांततापूर्वक चक्क जाम अंदोलन करीत आहेत.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here