राजुरा ..
राजुरा तालुक्यातील आर्वी गाव कानाकोपऱ्यात ओळख झाली ती कोंबड बाजाराची ,लाखोंची उलाढाल,तरुण मुले लागली होती वाईट व्यसनाला !
राजुरा विधान सभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत,हे सर्वांना माहीत आहे.पण पाणी कुठे मुरते ,हेही नागरिकांना माहीत आहे पण नागरिक काहीही करू शकत नाही ,सर्वच नागरिक तसे नाही एक, दोन टक्के नागरिकामुळे इतर नागतिकाना त्रास सहन करावा लागत आहे,दिवाळी नंतर कोंबड बाजार सुरू झाला ,तरीही कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या बेकायदेशीर सुरू असलेल्या कोंबड बाजारा बाबत लक्ष दिले नाही,हिम्मत करून एक पत्रकार गेले होते त्यांचे जे स्वागत केले त्यामुळे काही पत्रकार विचार करू लागले,पण एक गोष्ट मात्र खरी आहे अवैध धंदे करणारे जास्त दिवसाचे मालगुजार राहू शकत नाही हे कालच्या प्रकारावरून तुम्ही विचार करू शकता,काल पोलीस कोंबड बाजारात जात असताना ,आधीच बातमी मिळाली असलयाचे समजते,राजुरा शहरात दिवसभर चर्चेला उधाण आले होते ,आजी आमदार काही करू शकले नाहीत पण माजी करून दाखविल्याची चर्चा सुरू झ एका झटक्यात वामनराव चटप माजी आमदार यांनी पोलिसांना दिलेले पत्र आणि झालेली कारवाई ,त्यामुळेच लोक म्हणतात आजीवर पडले माजी भारी ,आता पुढचा प्रवास कोण सुरू करतो याकडे ,नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिकार न्युज