Home Breaking News महानगरपालिकेत घोटाळ्यांची नगरविकास मंत्र्यांकडे पप्पू देशमुख यांची पुराव्यानिशी तक्रार सोमवार दिनांक 21...

महानगरपालिकेत घोटाळ्यांची नगरविकास मंत्र्यांकडे पप्पू देशमुख यांची पुराव्यानिशी तक्रार सोमवार दिनांक 21 डिसेंबर रोजी पत्रकार घेऊन पुढील भूमिका मांडणार …

3
0

महानगरपालिकेत घोटाळ्यांची नगरविकास मंत्र्यांकडे पप्पू देशमुख यांची पुराव्यानिशी तक्रार
सोमवार दिनांक 21 डिसेंबर रोजी पत्रकार घेऊन पुढील भूमिका मांडणार

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत कचरा घोटाळा गाजत आहे.कचरा संकलन व वाहतुकीची निविदा मंजूर करताना 800 रुपये प्रति टन अधिकचे दर मंजूर करण्यात आले.या निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अनेक राजकीय पक्षांनी केलेला आहे. अशा प्रकारची तक्रार सुद्धा काही नगरसेवकांनी विविध पातळीवर केली. महानगरपालिकेचे विरोधी पक्षातील नगरसेवक शहर विकास आघाडीचे गटनेता पप्पू देशमुख यांनी आज याबाबत राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची एनडी हॉटेल येथे भेट घेऊन पुराव्यानिशी तक्रार केली.महानगरपालिकेत मागील तीन वर्षांमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झालेले असून या सर्व घोटाळ्यां बद्दल सविस्तर माहिती नगरविकास मंत्री यांना देण्यात आली.या भ्रष्टाचारामध्ये सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी तसेच अधिकारी यांचे संगनमत असल्याचा आरोप करून त्याचे दाखले देशमुख यांनी नगर विकास मंत्री शिंदे यांना दिले.
यावेळी शिवसेना नेते अजय स्वामी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे, अजय वैरागडे तसेच जन विकास सेनेचे घनश्याम येरगुडे, आकाश लोडे, अक्षय येरगुडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोविड-१९ आपत्तीमुळे महानगर पालिकेची आर्थिक स्थिती गंभीर झालेली असताना अनेक ठिकाणी अनावश्यक खर्च करण्यात येत आहे. अनेक निविदा प्रक्रिया कंत्राटदाराच्या लाभासाठी राबविण्यात येत आहेत.या घोटाळ्यांमुळे मनपाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी संगनमत व पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करीत असल्यामुळे सामान्य जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत आहे. सर्व घोटाळ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्ये विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. यावेळी मनपातील सर्व गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन शिंदे यांनी नगरसेवक देशमुख यांना दिले.

पत्रकार परिषदेत नगरसेवक देशमुख सविस्तर भुमिका मांडणार

 

 

 

कचरा घोटाळा व महानगरपालिकेतील आजपर्यंतचे इतर घोटाळे याबाबत आतापर्यंत केलेला पाठपुरावा तसेच यापुढील भूमिका याबाबतची माहिती देण्यासाठी नगरसेवक देशमुख उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत.कचरा संकलन व वाहतुकीच्या कामाबाबत मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या भूमिकेविरोधात देशमुख पत्रकार परिषदेतून पर्दाफाश करणार आहेत.या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षातील अनेक नगरसेवक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

संकलन
(प्रदीप उर्फ पप्पू देशमुख)

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here