Home Breaking News तुफानातील दिवे या कथासंग्रहात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांच्यातील...

तुफानातील दिवे या कथासंग्रहात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांच्यातील भेटीचा एक क्षण…

15
0

बाबासाहेब माझे गुरू होऊ शकतात असे बोलायचे, मी न शिकलेला माणूस, रस्त्यावर उतरून लोकांना चांगल सांगणारा पण डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी कायद्याचा आधार देणारा माणूस अशी पोहोच पावती ते द्यायचे. तुफानातील दिवे या कथासंग्रहात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांच्यातील भेटीचा एक प्रसंग आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ची एक सभा सुरु होती. तिथे गाडगे महाराज पोहचले. अचानक गाडगे बाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले. वर केलेल्या दोन्ही हातात हार घेउन स्टेजसमोर उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणाले. ‘बाबा तुम्ही खाली का उभे? वर या ना.’ ‘नाही बाबासाहेब तुम्हीच खाली या आणि या अडाण्याचा हार घ्या.’ ‘बाबा, तुम्ही अगोदर वर या मग मी हार घेईन’ ‘नाही बाबासाहेब, तुम्हीच आधी खाली या.’ बराच वेळ ते दोन महापुरूष एकमेकांना विनंत्या करीत होते.
बाबासाहेबांच्या भाषणाची तार तुटली होती. वेळ होत होता म्हणून बाबासाहेब जरा रागातच म्हणाले. ‘बाबा तुम्ही, स्टेजवर का येत नाही..? त्यावर ते संतशिरोमणी गाडगे महाराज शांतपणे स्नेहाद्र आवाजात बोलले.’ बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात, त्या स्टेजला पाय लावायची माझी तरी लायकी नाही.’ गाडगेबाबांच्या तोंडून असे बोल बाहेर पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली.
‘आता तुमचे चालू द्या.’ असे बोलून क्षणांत गाडगे महाराज निघून गेले. याला म्हणतात एका निष्कलंकित चारिञ्याने दुसऱ्या निष्कलंकित चारिञ्याची केलेली कदर… संतांचा निरोप घेऊन बाबासाहेब मंचाकडे वळले तर काय आश्चर्य… स्टेजवरील सर्व खुर्च्या रिकाम्या. सर्व नेते व कार्यकर्त्यांनी खाली प्रेक्षकांत बसणे पसंत केले. बाबासाहेब एकटेच मंचावरून भाषण देत होते आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. जेव्हा गाडगेबाबांचे कीर्तन चालू असायचे. तेव्हा बाबासाहेब तिथे गेल्यावर खालीच बसायचे.
लोक त्यांना म्हणायचे की बाबासाहेब आपण वर बसा. पण बाबासाहेब मात्र, खालीच बसायचे. ‘जेथे संत गाडगेबाबा असतील तेथे घाण असूच शकत नाही. ‘स्वतःच्या मुलाच्या मृत्यूने गाडगेबाबांवर कुठलाही परिणाम झाला नाही. परंतु बाबासाहेबांचा मृत्यू झाला हे समजल्यावर अवघ्या १४ दिवसात प्राण सोडणारे संत गाडगेबाबांचे आणि बाबासाहेबांचे संबंध कसे असतील? याची जाणीव यातून होते.
संत गाडगे महाराज म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण संस्थेला पंढरपूर येथील धर्मशाळा उपलब्ध करुन दिली होती. स्वत: एकही दिवस शाळेत न जाणाऱ्या संत गाडगे महाराजांना शिक्षणाचे महत्व समजले होते. आजही गाडगे महाराजांचे विचार आपल्या पिढीला प्रेरक ठरणारे आहेत.

तुफानातील दिवे या कथासंग्रहात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांच्यातील भेटीचा क्षण

सामान्य जनता त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी करीत असे. आपल्या रसाळ वाणीने आणि रोकड्या उपदेशाने भल्या भल्या धर्म प्रमुखांनी त्यांच्या समोर तोंडात बोटं घातली. ते कीर्तनाला उभे राहिले की, लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीला आवाहन करत
‘लोकहो…
देव तीर्थात किंवा मूर्तीत नाही,
दरिद्री नारायणाच्या रूपाने
तो तुमच्या समोर उभा आहे,
दीन दुबळ्यांच्या डोळ्यातील एक अश्रू पुसला की, देवाला एक अभिषेक घडतो हो…’
असे प्रवचन ते करायचे, खरं तर गाडगे महाराज हे ‘संतांमधील सुधारक आणि सुधारकामधील संत होते’ .
आजच्या पिढीतील काही संताची किर्तन ऐकल्यानंतर वैज्ञानवादी, गोरगरीबांच्या प्रश्नावर, आरोग्यावर, आर्थिक परिस्थिती वर बोलणारे किर्तनकार दुर्मिळ होते आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो.
भारताच्या खरं स्वच्छता अभियानाचे जनक संत गाडगे महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here