Home आपला जिल्हा भूमिहिनांच्या जमीनी हड़पणाऱ्या भूमाफियाविरुद्ध रिपाइं (आ) चे 21 ला धरने आंदोलन*

भूमिहिनांच्या जमीनी हड़पणाऱ्या भूमाफियाविरुद्ध रिपाइं (आ) चे 21 ला धरने आंदोलन*

3
0

वर्धा…

*भूमिहिनांच्या जमीनी हड़पणाऱ्या भूमाफियाविरुद्ध रिपाइं (आ) चे 21 ला धरने आंदोलन*
*वर्धा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन होणार सुरुवात.जनतेने सामिल व्हावे नम्र आवाहन*.

सावकारांच्या तावडितुन लाहन शेतकरी मुक्त व्हावा म्हणून डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांनी 1938 ला कोकण येथून खोतीप्रती विरुद्ध संघर्ष सुरु केला.लहान शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यावरील उपाय यावर लिहिलेला त्यांचा संशोधनपर निबंध जागतिक पातळीवर गाजला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1938 ला खोतीप्रतेविरुद्ध महाराष्ट्र विधिमंडळावर 25 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढला व त्यानंतर शेतकऱ्यानी आपल्या हक्कासाठी तब्बल 7 वर्ष संप केला.या संपाची नोंद जागतिक पातळीवर घेतल्या गेली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते कर्मवीर दादासाहेब गायकवाड़ यांच्या नेतृत्वात 1964 ते 65 दरम्यान भूमिहिनांसाठी न भूतो न भाविष्यतो असे आंदोलन देशात उभे झाले.”कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय” या एका घोषवाक्याने सारा आसमंत पेंटून उठला जेलभरो आन्दोलनाची घोषणा करण्यात आली या आंदोलनामुळे सरकारची झोप उडाली साडेतीन लाख लोकांनी स्वतःला अटक करुण घेतली होती जेल,शाळा आणि निवासाची सोय करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले होते.1972 च्या दशका नंतर भारतीय दलित पैंथरने रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भूमिहिनांसाठी गायरान जमीनीवर जबरन जोत आंदोलन पुकारले.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या आन्दोलनाची तीव्रता भयानक होती भूमिहीन असलेल्या अनेकांनी या जागेवर कब्जा केला व उदरनिर्वाह करित आहेत.
आपल्या देशात आजही असंख्य कुटुंब अशी आहेत कि त्यांच्या कड़े उदरनिर्वाहाचे साधन नाही.आज सुरु असलेल्या शेतकरी आन्दोलनाच्या नेत्यांना हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही.श्रीमंत शेतकरी हाच त्यांच्या लढ़याचा केंद्रबिंदु राहिला आहे.विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भूमिहिनांसाठी मिळालेल्या जागेवर भूमाफियांनी कब्जा केलेला आहे.आणि तेच भूमाफिया आज अंदोलनाच नेतृत्व करतांना दिसत आहेत.अश्या परिस्थितीत पुन्हा आम्ही भूमिहिनांच्या हक्कासाठी वर्धा येथून आन्दोलनाची सुरुवात कारित आहोत.आपल्या सदिछ्याच आमचे बळ आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) चे अशोक मेश्राम वसंत भगत,अरविंद मेहरा,धर्मपाल शंभरकर,विजय नगराले,अदिनात पाटील, बंडुभाऊ कदम मुन्ना साळवे,अनिल खडतकर,मधु ओरके,अशोक कांबले,रविन्द्र विजयकर,गजानन दापुरकर,संजय नगराले,आरविंद झामरे,शुभाष चहांदे सुभाष कांबले या आन्दोलनाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाले आहेत.

अशोक मेश्राम,
उपाध्यक्ष
रिपाइं (आ)
महाराष्ट्र प्रदेश.

।प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here