Home Breaking News लोकनेते स्व. प्रभाकरराव मामुलकरांचे विचार व कार्य प्रेरणादायी. :: आमदार सुभाष धोटेंच्या...

लोकनेते स्व. प्रभाकरराव मामुलकरांचे विचार व कार्य प्रेरणादायी. :: आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते स्व. प्रभाकरराव मामुलकर पुतळ्याचे अनावरण.

50
0

सुबई…

लोकनेते स्व. प्रभाकरराव मामुलकरांचे विचार व कार्य प्रेरणादायी.
— आमदार सुभाष धोटे.

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते स्व. प्रभाकरराव मामुलकर पुतळ्याचे अनावरण.

राजुरा (ता.प्र) :– स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर हे लोकनेते असून त्यांचे विचार आणि कृती सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. ते काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते, त्यांच्यानंतर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्यानंतर आपापसातील मतभेद विसरून एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. पुढील वर्षी राजुरा तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने काँग्रेस भवनात पुतळा बसवून त्यांचा जयंती सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येणार असे मत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १९ डिसेंबर सुब्बई येथे दुपारी १२ वाजता त्यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्यात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुमनताई प्रभाकर मामुलकर, प्रमुख अतिथी आ. शि. प्र. म. राजुराचे उपाध्यक्ष श्रीधरराव गोडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक जसविंदर धोतरा, दौलतराव भोंगळे, साजिद बियाबाणी, अॅड. अरूण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जि. प. सदस्य मेघाताई नलगे, प स उपसभापती मंगेश गुरणुले, पं स सदस्य सौ. कुंदा जेनेकर, रामदास पुसाम, बी. एच. अंगलवार, उपसरपंच जावेद अब्दुल, मुख्याध्यापक बी. एस. झाडे, अभिजीत भुते, सुब्बईचे सरपंच मारोती आत्राम, उपसरपंच बाबुराव आत्राम, सतीश बेतावार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक आ. शि. प्र. म. राजुराचे सचिव तथा माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, संचालन प्रदिप बोटपल्ले आभार तुळशीराम इरदंडे यांनी केले.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here