चामोर्शी….
*माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळाबंद आंदोलनास उत्सफुर्त प्रतिसाद.:-
तालुका प्रतिनिधी चामोर्शी:-
राज्यातील मान्यता प्राप्त व खाजगी व अंशता व पुर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारीऱ्यांची नियुक्ती मानधनावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसेच ११डिसेंबर२०२० ला तरतूद करण्यात आलेल्या शासन निर्णयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असलेल्या निषेधार्थ व्यक्त करीत. राज्य शाळाबंद आंदोलनात चामोर्शी तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा १८डिसेंबरला पुर्णतः बंद ठेवुन आंदोलनास सहभाग दर्शवला.
चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गाकरिता घेतलेल्या निर्णयामुळे या पदावर तुटपुंज्या मानधनात कोणीही काम करण्यास तयार होणार नसल्यामुळे हि कामे आता आता मुख्याध्यापक व शिक्षकांना करावे लागले ❓असा भिषण प्रश्न झाला आहे. शिपाई व प्रयोगशाळा परिचर हि पदे शाळेत महत्त्वाची आहेत. त्यामुळे असा अतिशय जाचक निर्णय शासनाने तात्काळ रद्द करावा अशी सर्वत्र मागणी होत आहे.
प्रतिकार न्युज