Home आपला जिल्हा चंद्रपुरात खरंच दारूबंदी आहे काय?

चंद्रपुरात खरंच दारूबंदी आहे काय?

34
0

 

चंद्रपूर – हा व्हायरल व्हिडिओ आहे चंद्रपुर जिल्ह्यातला. आणि या जिल्ह्यात आहे दारूबंदी.तीही सहा वर्षांपासून. मात्र या दारूबंदीला आव्हान देणारा हा व्हिडीओ एखाद्या बार-हॉटेलच्या उद्घाटनाचा नसून ही लग्नाची निमंत्रण पत्रिका आहे. देशाच्या काही भागात अशा पद्धतीने निमंत्रण पत्रिकांचे चलन असेलही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात याचे वेगळे महत्त्व आहे. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी ती कागदावर आहे हे सर्वश्रुत आहे. मात्र याच महिन्याच्या 15 तारखेला चंद्रपूर जिल्हा स्थानी हा विवाह सोहळा संपन्न झाल्याचं निमंत्रण पत्रिकेवरून स्पष्ट होत आहे. या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसह एका छोट्या गिफ्ट बॉक्स मध्ये दारूची बाटली पाणी आणि चखणा असे गिफ्ट पाहुण्यांना पाठविले गेले. निमंत्रण पत्रिकेचा हा व्हिडिओ सध्‍या वायरल झालाय. एकीकडे दारूबंदीच्या निमित्ताने पोलिसांवर हल्ले होत आहेत. कोट्यावधी रुपयांची दारू पोलीस जप्त करत आहेत. हजारो आरोपी तयार होत आहेत. अशातच या दारूबंदी दरम्यान दारूलाच लग्नबंधना एवढेच पावित्र्य देण्याचा प्रयत्न यजमानांनी केलेला दिसतो. तोही सर्व कायदे धाब्यावर बसवत. चंद्रपूर पोलिसांना आता या वायरल व्हिडिओची सत्यता पडताळून पाहत कारवाई करण्याचे मोठे आव्हान आहे. या व्हिडिओने अनेक सामाजिक प्रश्न मात्र निर्माण केले आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here