Home विशेष लग्नपत्रिकेच्या निमंत्रणासोबत दारूची बाटली आणि चखणा.

लग्नपत्रिकेच्या निमंत्रणासोबत दारूची बाटली आणि चखणा.

25
0
   Dec 18, 2020

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये लग्नपत्रिकेच्या निमंत्रणासोबत दारूची बाटली आणि चखणा देण्यात आलाय. चंद्रपूर शहरात 15 डिसेंबर हे लग्न पार पडले. या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसह दारू -चखणा दिला गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेत आहे.
 
चंद्रपूर जिल्ह्यात सहा वर्षापासून दारूबंदी आहे. अशा पद्धतीने खुलेआम निमंत्रण पत्रिकेसह दारू वितरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ आहे. पोलिसांपुढे या व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळून पाहत कारवाईचे आव्हान केलंय.
 
महिलांचा राग अनावर:-
चंद्रपुरात अवैध दारू विक्रीवर पोलीस प्रशासनाचा कुठलाही अंकुश नसल्याचं चित्र आहे.पठाणपुरातल्या ‘रामा दंड्या सवारी’ या स्थळाजवळ एका गल्लीत सौरभ नावाचा दारू विक्रेता चक्क अवैध दारू बार चालवत होता. दारुड्यांचा त्रासामुळे संतापलेल्या महिलांचा राग अनावर झाला.
 
दारू विक्रेत्याने ‘पोलीस आपल्या खिशात आहेत’ अशी वल्गना करताच महिलांनी रुद्रावतार धारण केला. अड्डयाच्या आत जाऊन त्यांनी शेकडो पेट्या दारू बाहेर काढली आणि आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. महिलांच्या या आक्रोशाच्या अनपेक्षित प्रकाराने पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी देखील चक्रावले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here