राजुरा…
विशेष प्रतिनिधी …
राजुरा शहरात सेतू केंद्रावर नागरिकांची सर्वत्र आर्थिक लूट केल्या जात आहे,यात सेतू केंद्र चालक मालामाल होत आहे.
तर निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांना लुटत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक प्रकारचे दाखले लागतात ते सर्व सेतू केंद्रतून घ्यावे लागते,असा वेळेस अनेकांना माहिती नसल्याने,मागेल तेवढे पैसे देतात ,सेतू केंद्र समोर राजुरा शहरात एकही दर पत्रक बोर्ड लावलेला दिसत नाही ,सेतू केंद्र मागणूच्या वेळेस जे नियम आहेत ते नियम राजुरा शहरात पाळताना कोणीही दिसत नाही ,याबाबतची बातमी प्रतिकार न्युज पोर्टल मध्ये दिली होती ,पण काहीही कारवाही झाली नाहि.खाजगी सेतू केंद्रवर असलेली गर्दी ,आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष कारणीभूत आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत ,11पत्र फार्म भरताना जोडावे लागत असल्याने उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे,पोलीस विभागाकडून चरित्र दाखला ,पॅन कार्ड,बँक पासबुक,जन्माची तारीख,अशा प्रकारे कागद पत्र जुळवाजुळव करताना,आलेल्या तीन दिवस सुट्ट्या अडचणीचे ठरणार आहे,चंद्रपूर जिल्ह्यात सेतू केंद्रवर होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे दिसून येते,शहरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणारी लूट थांबविण्यासाठी पावती नुसार पैसे घेण्याचे सेतू संचालक याना तशी ताकीद द्यावी ,आणि सेतू केंद्रासमोर प्रतेकाना दिसेल अशा ठिकाणी लावण्यास सांगावे,सोबतच सेतू केंद्राचे बिल खर्च म्हणून उमेदवारांना जोडण्यास सांगावे म्हणजे प्रत्येक नागरिक पाटी मागेल,जो कोणी पावती पेक्षा जास्त पैसे घेत असेल त्यांनी 7038636121 यानंबर वर सम्पर्क साधावा असे आवाहन प्रतिकार न्युज पोर्टल च्या वतीने करण्यात येत आहे.
आपण ही बातमी वाचून इतरांना शेअर करा,
प्रतिकार न्युज