Home Breaking News सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर स्टेशन दरम्यान १२.०० कि.मी. ट्रॅकचे कार्य पूर्ण*

सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर स्टेशन दरम्यान १२.०० कि.मी. ट्रॅकचे कार्य पूर्ण*

2
0

नागपूर…

सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर स्टेशन दरम्यान १२.०० कि.मी. ट्रॅकचे कार्य पूर्ण*

  1. *रिच – ४ व्हायाडक्टचे ८९% कार्य पूर्ण : सी.ए. रोड येथील मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य गतीने सुरु*

*नागपूर, १८ :* महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापती नगर कॉरीडोरचे कार्य जलद गतीने सुरु असून, रिच – ४ या मार्गिकेवर सुमारे १ कि. मी. (अप अँड डाऊन लाईन) मधील १२ कि.मी. एवढ्या मेट्रो मार्गावर रूळ बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. या मार्गावरील निर्माण कार्यादरम्यान लावण्यात आलेले बहुतेक भागातील प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असल्याने त्या भागातील बॅरिकेट्स काढण्यात आले आहे.

 

 

 

मुख्य बाब म्हणजे या मार्गिकेवर महा मेट्रो देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रीज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सीताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत निर्माण कार्य सुरु आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रॅक वरून १०० मीटरचा एक स्पॅन (३ मीटरचा एक गर्डर) या रेल्वे ट्रॅकवरून राहणार आहे. तसेच मेट्रो या मार्गिकेच्या ८९% व्हायाडक्टचे कार्य पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवरील मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य गतीने सुरु आहे

 

सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.३० किमीच्या या मार्गावर एकूण नऊ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे ज्यामध्ये कॉटन मार्केट,नागपूर रेल्वे स्टेशन,दोसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलिफोन एव्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक,प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे.

या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून, मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे. नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते. नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवतांना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली. या मार्गिकेवरील प्रवासी सेवा सुरु झाल्यावर मेयो हॉस्पिटल, रेल्वे स्थानक,कॉटन मार्केट,इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here