Home Breaking News 17 डिसेंबर 1946 ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संसदेत भारतीय संविधान निर्माण...

17 डिसेंबर 1946 ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संसदेत भारतीय संविधान निर्माण ….

38
0

नागपूर

आज 17 डिसेंबर 2020 बरोबर 74 वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला म्हणजे 17 डिसेंबर 1946 ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संसदेत भारतीय संविधान निर्माण प्रक्रियेतील प नेहरूंनी मांडलेल्या ध्येय व उद्धिष्ट या ठरावावर आपले पाहिले भाषण केले।या भाषणात त्यांनी भारताचे ऐक्य आणि मुस्लिमांची मूर्खपणाचे मागणी काशी अयोग्य आहे यावर अप्रतिम भाषण केले होते।त्या भाषणात सर्वच सदस्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले।या भाषणाचा प्रभाव आचार्य प्र के अत्रे यांच्यावर एवढा पडला की ते तेव्हापासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रशन्सक झाले।या घटनेचे वर्णन अर्त्यांनी पुढील प्रमाणे केले आहे,”जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याच्या आड येऊ शकणार नाही आणि अखंड हिंदुस्तानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्या मुसलमानांना ही कळून येईल ,ही आंबेडकरांच्या मुखातून बाहेर पडलेली दोन अमर सत्ये होत।
ती एकूण आम्ही स्वतः आंबेडकरांवर एवढे खुश झालो की यापुढे त्यांच्याविरुद्ध एक अक्षरही आपण आता लिहावयाचे नाही अशी गेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिवशी आम्ही शपथ घेतली ”
अर्त्यांनी घेतलेली शपथ पुढे आयुष्यभर पाळली।एवढेच नाही तर त्यांनी पुढे या तारखेपासून 1959 पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर नवयुग व मराठा मधून एकूण 23 लेख लिहिले आहेत।हे सर्व लेख दलितांचे बाबा या पुस्तकात समाविष्ट केले आहेत।
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे घटनासमितीतील हे पहिले भाषण खंड 18 (3)मध्ये उपलब्ध असून आंबेडकरी लोकांनी आजच्या दिवशी या भाषणाचे अवश्य वाचन करावे व आपला ऐतिहासिक दिन हे भाषण वाचून साजरा करावा।

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here