Home राजकारण कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायीतीवर भाजपाचा झेंडा फडकवा:-माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे*

कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायीतीवर भाजपाचा झेंडा फडकवा:-माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे*

45
0

कोरपना…

कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायीतीवर भाजपाचा झेंडा फडकवा:-माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे*

*नारंडा येथे ग्रामपंचायत कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न*

कोरपना तालुक्यातील १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीसंदर्भात नारंडा येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली नारंडा येथे बैठक संपन्न झाली.
ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे तसेच जास्तीत ग्रामपंचायत मध्ये आपले सदस्य निवडून आणण्याकरिता अथक परिश्रम करावे.कोरपना तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतच्या निवडणूक होऊ घातलेल्या आहे. कोरपना तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी केले.
याबैठकिला संजय मुसळे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,रमेश पाटील मालेकर,वासुदेव आवारी,कान्हाळगावचे सरपंच विनोद नवले,पिपरी सरपंच कवडू कुंभारे, सांगोडा सरपंच सचिन बोंडे, हिरापूर सरपंच प्रमोद कोडापे,भोयगाव माजी सरपंच बंडू जुनघरी,लोणी उपसरपंच संजय पिंपळशेंडे, उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल मालेकर,सत्यवान चामाटे, अजय तिखट,प्रवीण हेपट,गजानन चतुरकर, यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद खाडे यांनी केले.

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here