Home क्राइम कामठीत माजी सैनिकांच्या घरावर पाच अज्ञात आरोपींचा दरोडा; तब्बल एक लाख २०...

कामठीत माजी सैनिकांच्या घरावर पाच अज्ञात आरोपींचा दरोडा; तब्बल एक लाख २० हजार रुपयांची लूट प्रतिकार न्युज

10
0

प्रतिकार न्युज

शिल्पा मेक्षाम
कामठी (जि. नागपूर) : स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत येणाऱ्या रणाळा येथील रामू बिअर बारच्या मागे असलेल्या पुरुषोत्तम ले आउट मधील रिद्दीसिद्धी टाऊनशीप मध्ये राहणाऱ्या दोन माजी सैनिकांच्या घरी काल १५ डिसेंबरच्या मध्यरात्री अडीच दरम्यान अज्ञात पाच आरोपीनी दरोडा घालण्याची घटना घडली.

यातील एका माजी सैनिकाच्या घरातून दबाव तंत्राचा उपयोग करून एक लक्ष २० हजार रुपयांची घरफोडी करून चोरी केली तर दुसऱ्या माजी सैनिकांच्या घरातून काहीही हाती न लागल्याने घरातील सामान अस्तव्यस्त करून रिकाम्या हाताने उलटपायी परतले. तर यासंदर्भात फिर्यादी माजी सैनिक सुनील डेव्हिड ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 395, 457, 504 अनव्ये गुन्हा नोंदविला मात्र सुरक्षित ठिकाणी असलेल्या टाऊनशीप मध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून त्या परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून तेथिल रहिवासी वर्ग स्वतःला असुरक्षित मानत आहेत.

प्राप्त माहीती नुसार सदर घटनास्थळ असलेल्या रिद्दीसिद्धी टाऊनशीप मध्ये ३० च्या जवळपास नागरिक वास्तव्यास आहेत. चार वर्षांपूर्वी सुनील डेविड पत्नी रोशनी हे आपल्या दोन मुलाला घेऊन राहायला कॉलोनीत राहायला आले सुनील हे सध्या बँक ऑफ इंडिया नागपूर च्या एका शाखेत सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत ते २०१२ मध्ये सैन्यातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांची पत्नी येथील सेंट व्हिन्सेंट पलोटी या शाळेत शिक्षिका आहेत त्यांना दोन मुले असून शिक्षण घेत आहेत.फिर्यादी सुनील डेव्हिड सैन्यातून सेवानिवृत्त झाल्याने सेवनिवृत्तीच्या रकमेतून रनाळा येथील रिद्दीसिद्धी टाऊन शिप मध्ये कायमचे वास्तव्यास आहे.

दैनंदिन नुसार काल रात्री जेवण करून फिर्यादी कुटुंबिय सदस्य निवांत झोपी गेले असता मध्यरात्री अडीच दरम्यान तोंड झाकून असलेले पाच अज्ञात इसम हातात लाकडी बॅटचा तुकडा घेऊन मास्टरचाबीने दार उघडून अवैधरित्या घरात शिरले. तळमजल्यावर झोपले असलेल्या फिर्यादीचे मुलांना या दरोडेखोरांना बघतच भिती वाटली आणि घाबरले. दरम्यान आवाज येताच पहिल्या माळ्यावर झोपेत असलेल्या फिर्यादी व त्याची पत्नी पायऱ्यांने खाली उतरले असता त्यांना अज्ञात आरोपीने बजावून सांगितले की गुपचूप आम्हाला सहकार्य करा,अन्यथा तुमच्या मुलांचे वाईट होईल तेव्हा भावनेच्या आहारी आलेल्या आई वडिलांनी दरोडेखोरांच्या ताब्यात असलेल्या मुलांची चिंता लक्षात घेत तुम्हाला काय पाहिजे ते घ्या पण मुलांना सुरक्षित ठेवा असे सांगितले असता आरोपीनि फिर्यादीच्या पत्नीच्या पर्स मधून नगदी दहा हजार रुपये, बोटातली सोन्याची अंगठी तसेच वरच्या माळ्यावरील कपाटात असलेले परवाना प्राप्त पिस्टल घेऊन पसार झाले.

तर त्यानंतर नजीकच्याच कुलुपबंद असलेले दुसरे माजी सैनिक शरद सहारे यांच्या घरात अवैधरित्या शिरले मात्र घरात कुणी नसल्याने घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त करून कुठून काहीतरी मिळणार असे अपेक्षित होते मात्र तसे काही प्राप्त न झाल्याने रिकामे हाताने उलटपायी पळ काढला. रात्री पावणे तीन च्या सुमारास पोलीस स्टेशन ला येऊन सुनील डेविड यांनी तक्रार देऊन नाईट ऑफिसर विनायक आस्टतकर यांना घटना सांगितली.घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमीतेश कुमार, डीसीपी निलोत्पल, एसीपी कार्यकर्ते, सदर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, नवीन कामठी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे, कळमना पो स्टे चे पोलिस निरीक्षक चव्हाण, गुन्हे विभाग पथक, श्वानपथक आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर घटनास्थळी भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. आरोपीचा काहीतरी सुगावा लागावा यासाठी आजूबाजूचा परिसराची पाहणी करीत काही दूर अंतरावर असलेल्या एका ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी पसार होताना दिसून येत आहेत. त्यामुळे आरोपींचा लवकरच शोध लागणार अशी शक्यता पोलीस वर्गातून वर्तविण्यात येत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here