चंद्रपूर….
‘किसान आंदोलन’ चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात लाक्षणिक उपोषण
केंद्र सरकारच्या तीनही नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात ‘किसान आंदोलन चंद्रपूर’ने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दिनांक १४ डिसेंबर २०२० रोजी जन विकास सेना व जाट सभेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दिल्लीच्या आंदोलकांनी देश पातळीवर पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला समर्थन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.तिनही नविन कृषी कायदे मागे घ्यावे,उद्योगपतीच्या नव्हे तर शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे नव्याने तयार करण्यात यावे तसेच हमीभावाला कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत किसान आंदोलन चंद्रपूरचा विरोध सुरू राहील अशी भूमिका जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.दिल्लीमधील किसान आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून दुपारी १२ वाजता लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन बन्सोड, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, सचिव संतोष दोरखंडे ,सिटूचे दिलिप राव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.युवा कार्यकर्ते अक्षय येरगुडे,गितेश शेंडे, आकाश लोडे,राहुल दडमल यांनीसुद्धा यावेळी नवीन शेतकरी कायद्या बद्दल भूमिका मांडली.दुपारी ४ वाजता राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता करण्यात आली.
आंदोलनामध्ये जाट सभेचे गुरपाल सिंग,जन विकास ग्रामीण सेनेचे अनिल कोयचाळे, जीवन कोटरंगे, शरद मोहुर्ले, धर्मेंद्र शेंडे, पिंटू सातपुते, धनराज जुनघरे,सचिन पिंपळशेंडे, चंदू झाडे,दिनेश झाडे, तुषार निखाडे,संगम थोरात, प्रवीण मटाले,शंभू नैताम,भिकू मेश्राम, संदीप वरारकर,मृणाल झाडे, कमलेश मेश्राम,विष्णू कुमरे,सुनिल बुटवे, सुरेश मेश्राम,श्रीराम सेनेचे वैभव एनपल्लीवार तसेच आम आदमी पार्टीचे शिवराज सोनी,अजय डुकरे,दिलिप तेलंग,बबन कृष्णपल्लीवार इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी जन विकास सेनेचे घनश्याम येरगुडे,मनीषा बोबडे, सुहास फुलझेले, किशोर महाजन, दिनेश कंपू,इमदाद शेख, नामदेव पिपरे, देवराव हटवार, प्रफुल बैरम इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले.
संकलन
(प्रदीप उर्फ पप्पू देशमुख)
प्रतिकार न्युज