नागपूर…
*छत्तीसगड राज्य
महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या श्रीमती नायक यांनी केलेल्या वक्तव्याची न्यायालयाने दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी… डॉ.नीलम गोऱ्हे*
तसेच त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध डॉ.गोऱ्हे
मुंबई दि.१४ : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी देशातील सर्व राज्य कडक कायदे करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत छत्तीसगड च्या महिला आयोग्याच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलेल्या, ‘ब्रेकअप झाल्यानंतर मुलींकडून बलात्काराचे आरोप केले जातात’ असे वक्तव्ये केले होते त्याचा आज डॉ.नीलम गोऱ्हे यांनी चांगलाच समाचार घेतला.
डॉ.गोऱ्हे ह्या पुढे म्हणाल्या की, अनेक गुन्ह्यात अपहरण करून बलात्कार केले जातो, अल्पवयीन मुली असतात त्यांना फूस लावून फळवून नेले जाते आणि त्याच्यावर बलात्कार केले जातात. ज्याप्रमाणे हाथरसच्या केस मध्ये झाले की, आरोपीच्या वकिलांकडून पीडित लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती किंवा ऑनर किलिंगचा आरोप केले जातो जेणेकरून बलात्काराच्या आरोपींना सुटणे सोपे व्हावे. छत्तीसगडच्या महिला अध्यक्षाने केले विधान निषेधार्थ आहे. श्रीमती नायक यांनी केलेले वक्तव्ये हे बलात्कारातील आरोपींना संरक्षण देणारे आहे. न्यायालयाने श्रीमती नायक यांच्या वक्तव्याची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे अशी मागणी डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केली.
प्रतिकार न्युज