Home सांस्कृतिक तरूण पीढीला प्रेरणा देणारा हा मंगल परिणय विवाह नागपूरात घडला.

तरूण पीढीला प्रेरणा देणारा हा मंगल परिणय विवाह नागपूरात घडला.

4
0

नागपूर…

एक प्रेरणादायी विवाह संस्कार!
विवाह (मंगल परीणय) हा मानवी जीवनातला मोठा संस्कार आहे. पण आज विवाह संस्कार मनोरंजनात अडकत आहे. आनंद मनोरंजनात फरक आहे. उपस्थीत वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे. विवाहातील वातावरण वर-वधुवर संस्कार करणार भावी जीवनाच्या जवाबदारीची जाणीव करूण देणारे असावेत.त्यात जीवन आनंदाचे क्षण असतात.
पण अलीकडे नवरदेवाचे मंडपार्यंतचे आगमन अनेक ठीकाणी नाचणाऱ्यांचा धांगडधींगा, बँड – डीजेचा कर्कश आवाज, जोरजोरात फटाक्यांचे प्रदुषण वेळेचे भान नाही.
विवाहाच्या स्टेजवर नातेवाईकांची गर्दी, जवाना पासून तर म्हातारे या गर्दीत वर-वधु त्यांच्या गराड्यात फसलेले. त्यात लग्न संस्कारातील प्रत्येक धर्मातल्या रूढ्या मंत्र, स्तोत्र,वीधी पुजा, सारच गोगांटात सुरू असते. त्याच गांभीर्य कोणालाच कळत नाही. वीधी फक्त परंपरेतच अडकलेले दीसतात.

या संस्कारावर सत्य शोधकांनी चांगले विचार मांडले. महात्मा ज्योतीबा फुलेनीं ‘सत्यशोधक लग्न पध्दति’ लोकांमध्ये रूजवण्याचा प्रयत्न केला. पण काळाच्या ओघात बहुजन समाज जागृत झाला नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत वैवाहीक जीवन विचार देत लग्न संस्काराची चांगली वीधी सांगीतली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द धम्म स्वीकारतांना सर्वच अंधरूढ्या समाज विघातक संस्कार नाकारले.
भगवान गौतम बुध्द, चक्रधर स्वामी, महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी या महामानवांचे विचारातील सत्यशोधन एका तरूणाने फार बारकाव्याने केले. त्या तरूणाचे नाव आहे कुणाल मदन रामटेके , वडील चक्रधराच्या महानुभाव विचाराचे पण त्यांनाही सत्य महानुभाव विचार सांगण्याची हीम्मत कुणालने केली. बुद्ध-फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचार क्रांतीची बीजे त्याला विद्यार्थी दशेतच त्याच्या मणाला भीडली होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंज आश्रमातील मानव सेवा छात्रालयात त्याच शालेय शीक्षण झाल. वर्गात शीक्षक नाही तर विद्यार्थी फरमाइश कुलदीपच किर्तन ऐकायची. आज कुलदीपची लेखनी शब्दरूपी धारेने अन्याय अत्याचार जगासमोर मांडत मानवता शीकवते .
कुणाल रामटेके तसा रीद्धपूर महानुभावाच्या काशीचा राहणारा. नुकताच त्याचा क्रांतीकारी विवाह शुभांगी राजेंद्र नानवटकर यांच्या सोबत झाला. तरूण पीढीला प्रेरणा देणारा हा मंगल परिणय विवाह नागपूरात घडला.
मोजकी गर्दी नातेवाईक अभ्यासकांची. प्रबोधनपीठ उभारलेल त्यावर बुध्द,फुले, शाहु,आंबेडकरांच्या प्रेरणादायी प्रतीमा विराजमान. डीजे नाही बँड नाही. कुणाल-शुभांगी जीवनाचा हाथ घट्ट धरत प्रबोधन पीठावर विराजमान झाले. वर-वधु आणि महापुरूषांच्या प्रतीमा शीवाय कोणीही प्रबोधन पीठावर धर्मशास्त्री उपस्थीत नव्हते. सर्व शांततेने हा नयनरम्य प्रेरणादायी विवाह सोहळा न्याहळत होते. भारताच्या संविधानाच्या प्रस्तावीकेच्या सामुदायीक वाचन करण्यात आले.
चळवळीतील भीमगीताने विवाह सोहळ्याचा शुभारंभ झाला. मोठ्या स्क्रीनवर काही वर-वधुंच्या कार्याचे स्मरण करणारे फोटो दाखवीले. मुंबई, दील्ली, बीहार इतर भारतातून काही मान्यवरांनी ऑनलाईन शुभेच्छा वर-वधुंना दील्या. काही ऐतीहासीक आठवणी त्यांच्या मीत्रांनी शेयर केल्या. शाहीर संभाजी भगत यांचे बोल ऐकायला मीळाले.
कुणाल रामटेके प्रस्तावना करतांना म्हणाला, “अम्ही हा मंगल परीणय कोणाच्या मध्यस्थीने जबरदस्थीने केला नाही. खोट्या प्रेमाच्या आणाभाकातून नाही.एकमेकाला समजून घेऊन आम्ही निर्णय घेतला आहे. शुंभागीने तशाच भावना व्यक्त केल्या. त्यांच्या प्रबोधनातून खुप प्रेरणादायी तरूण- मण जागृत करणारे विचार कळले.
कवि लोकनाथ यशवंत, राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारेचे ज्ञानेश्वर रक्षक, प्रा. मेश्राम ,अध्यात्म गुरूकुलाचे रवीदादा मानव यांनी शब्दरूपी शुभेच्छा दिल्या.
कुणाल-शुंभागी यांनी सर्व उपस्थीतांच्या साक्षीने कुठलाही धार्मीक वीधी न करता फक्त प्रतिज्ञा जीवनसाथी म्हणून सुंदर शब्दात जीवन एकत्र जगण्याच्या आणाभाका घेतल्या. हाथ जोडून सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. तरूण पीढीने आदर्श घ्यावा. असा हा विवाह मंगलं परीणय सोहळा संपन्न झाला. त्याचे साक्षीदार आम्हाला होता आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत ‘वैवाहिक-जीवन या अध्यायात लिहतात-
विवाहाआधी परस्पराने । पाहावे दोघांनाहि निश्चयाने ? ।
विचारस्वातंत्र्य दोघांसहि देणे । अगत्याचे ॥११॥
विवाहाचा जो संस्कार । त्याचे महत्व सर्वात थोर ।
त्या पायावरीच समाजमंदिर । म्हणोंनि सुंदर करा यासि ॥१०२॥
:ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा !

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here