चंद्रपुर….
ताडोबा_अंधारी_व्याघ्र_प्रकल्प चंद्रपूर लगतच्या बोर्डा, वायगाव, घंटा चौकी, मोहुर्ली व इतर गावातील_नागरिकांना पुरवठा करा
जंगल लागत असलेल्या गावत बांबू पासून वस्तू तयार करण्याचा प्रमुख व्यवसाय असून ,वनविभागामार्फत मागील दिड वर्षांपासून बांबू मिळत नसल्याने या तेरा गावामधील हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गावकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांचेशी गावकऱ्यासमवेत बैठक घेऊन समस्यांवर चर्चा केली. बैठकीत गावकर्यांना 12 महिने बांबू उपलब्ध करुन देणे, कारागीरांवर ठराविक वस्तू तयार करण्याचे कोणतेही बंधन नसावे, जास्तीत जास्त बांबू उपलब्ध करुन देणे, परवानगी घेवून वाहतूक करणाऱ्या गाड्यांची अडवणूक करु नये, गावातील कारागीरांना गावात वस्तू निर्मिती चे प्रषिक्षण देणे या मागण्यांवर चर्चा केली. याबाबत वन विभागातर्फे येत्या दोन दिवसात बांबू उपलब्ध करून देण्यावर व गावातील कारागिरांना प्रशिक्षणही देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगांवकर, खुशाल बोंडे, अनंत ठाकरे, अनिल रायपूरे, आत्माराम तावाडे, बाळू सागोरे, यशवंत मांडवकर, प्रमोद देवगडे, भगवान चांदेकर, बारसागडे, ताडोबा प्रकल्पाअंतर्गत येत असलेली बोर्डा, निंबाळा, वायगांव, घंटा चैकी, झरीपेठ, पहामी, हळदी, मोहुर्ली, देवाडा, अडेगांव, आगरझरी, जूनोना, डोणी आदि गावातील अंकूष झांकर, गुरुदास भोई, बाबुलाल नागवंषी, बोलबो विषाल, चेतन भोई, रावजी खैरवार, मारोती सुरपाम, चंदू चैधरी, राकेष कुमरे, राहूल कुळमेथे, सुरेष आत्राम, रामा आलाम, रमेष टेकाम, श्रीहरी सोयाम, संतोश दुपारे, गणेष किन्नाके, मिथून घोडाम, अषोक गावडे यांचसह असंख्य बांबू कारागरीर व नागरीक यावेळी उपस्थित होते.
प्रतिकार न्यूज़